Dhananjay Mahadik | … या पुढे महाभारत घडणार, धनंजय महाडिकांचा इशारा, सतेज पाटील म्हणतात, जनताच पांडवाचं रुप घेईल!

कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. यात सत्ताधारी पक्षाकडून रणनीती आखण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना सतेज पाटील यांनी धनंजय महाडिकांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं.

Dhananjay Mahadik | ... या पुढे महाभारत घडणार, धनंजय महाडिकांचा इशारा, सतेज पाटील म्हणतात, जनताच पांडवाचं रुप घेईल!
धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांचा परस्परांना इशारा Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 5:40 PM

कोल्हापूरः एवढे वर्ष वाईट दिवस पाहिले, प्रचंड त्रास दिला गेला. पण जिल्ह्याच्या राजकारणात यापुढं महाभारत घडणार आहे, असा इशारा कोल्हापुरचे भाजप खासदार (BJP MP) धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिलाय. अडीच वर्षात मला, माझे कार्यकर्ते आणि संस्थांना यांनी त्रास दिलेला आपण सर्वांनी पाहिलंय. पण इथून पुढे असं घडणार नाही, असं धनंजय महाडिक यांनी एका कार्यक्रमात सांगितलं. तर काँग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिलं. आम्ही रामायण करणारी माणसं आहोत .पण महाभारत घडलं तर जनताच पांडवांचं रुप घेऊन काय करायचं ते करेल, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.

धनंजय महाडिक काय म्हणाले?

दोन महिन्यांपू्र्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक हे भाजपतर्फे निवडून आले. कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या उमेदवाराचा त्यांनी दारुण पराभव केला. गेल्या काही वर्षांपासून सतेज पाटील यांनी महाडिक यांच्याविरोधात अनेक षडयंत्र रचून राजकारण केल्याचा आरोप महाडिक यांनी केला. त्यामुळे अनेक निवडणुकांमध्ये महाडिक यांना पराभव पत्कारावा लागला. आता तर राज्यातदेखील शिंदेसेनेसोबत भाजप सत्तेत आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना इशारा देताना धनंजय महाडिक म्हणाले, कूटनीती, कपटनीतीने ज्या पद्धतीने अभिमन्यूला घेरलं गेलं. त्या पद्धतीनं माझा घात करण्याचं काम झालं. गेले अडीच वर्ष खूप त्रास सहन केला. माझ्या अनेक संस्था, कार्यकर्त्यांना. उद्योगांना त्रास झाला. माझ्यावरच १४ केसेस दाखल केल्या. पण आता इथून पुढे महाभारत होणार आहे. वाईटाचा नाश होणार आहे… चांगल्याला यश मिळणार आहे…’

सतेज पाटलांची प्रतिक्रिया काय?

धनंजय महाडिकांच्या वक्तव्याला उत्तर देताना सतेज पाटील म्हणाले, ‘ मला वाटतं आम्ही रामायण करणारी मंडळी आहोत. चांगलं जे करताये ईल महाभारत घडलं तर जनता पांडवाचं रुप घेऊन काय करायचं ते करेल…

कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची सभा

राज्यात मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर प्रथमच कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट रोजी होणार आहे. यात सत्ताधारी पक्षाकडून रणनीती आखण्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना सतेज पाटील यांनी धनंजय महाडिकांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.