Breaking : कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध, अमल महाडिकांचा उमेदवारी अर्ज मागे

पूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कारण, त्यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Breaking : कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध, अमल महाडिकांचा उमेदवारी अर्ज मागे
सतेज पाटील, काँग्रेस नेते

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या (Kolhapur Legislative Council) जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांची बिनविरोध निवड झाली आहे. कारण, त्यांच्याविरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक (Shaumika Mahadik) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे अमल महाडिक यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट दिल्लीवरुन फोन आल्यानं त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळतेय.

पक्षादेशामुळे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतला- धनंजय महाडिक

‘राज्यात गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे कोणत्याही निवडणुका होऊ शकल्या नव्हता. पुढे जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सलोखा रहावा. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा सुरु होती. भाजपसाठी मुंबईची जागा महत्वाची आहे, ती बिनविरोध झाली आहे. त्या बदल्यात कोल्हापूर करावी अशी वरिष्ठांची मागणी होती. तसंच धुळे-नंदुरबारची जागाही आम्हाला मिळाली पाहिजे, ही भूमिका भाजप नेत्यांनी आग्रही ठेवल्यामुळे तिथे अमरिश पटेल यांचीही बिनविरोध करायची, म्हणजे दोन भाजपच्या जागा. आम्हा एक सीट जास्तीची पदरात पडली. भाजपच्या दोन जागा त्या बदल्यात कोल्हापूरची एक जागा त्यांना द्यावी हा पक्षादेश आज झालेला आहे’.

‘दीड वाजता देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला आणि त्यांनी अशा घडामोडी झाल्या असल्याची माहिती दिली. या विभागात आम्ही भाजप आणि मित्रपक्ष यांच्यावतीनं अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरला होता. शौमिका अमल महाडिक यांचाही उमेदवारी अर्ज भरला होता. हे दोन्ही अर्ज आम्ही मागे घेतले आहेत. सदस्यसंख्या आमच्याकडे चांगली झालेली होती. पण पक्षादेशामुळे आम्ही याठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती धनंजय महाडिक यांनी दिली.

अमल महाडिक काय म्हणाले?

मी भारतीय जनता पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. पक्षाने आदेश दिला की निवडणूक लढ, मी तयार झालो. त्याच पद्धतीने आज आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांचा, तसंच पक्षाचा आदेश मान्य करुन माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे, असं मत अमल महाडिक यांनी व्यक्त केलं.

इतर बातम्या :

फडणवीस, चंद्रकांत पाटील दिल्लीत, बीएल संतोष यांच्यासोबत खलबतं; महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा?

MLC ELECTION निवडणूक अविरोध करण्याचा प्रस्ताव, लवकरच निर्णय होणार – नाना पटोले

Published On - 2:23 pm, Fri, 26 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI