खासदारसाहेब, सांगा शिवसैनिकांचं काय चुकलं?, धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा
धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा

कोल्हापूर : सध्या शिवसेनेत अस्थिर परिस्थिती आहे. शिंदे गटाकडे जाणाऱ्या नेत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. पण आपल्या नेत्याने उद्धव ठाकरे यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात जाणं अनेकांना पसंत पडत नाहीये. आमदारांनतर काही दिवसांआधी शिवसेनेच्या खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला.यात कोल्हापूरच्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला. त्यानंतर कोल्हापुरात नाराजी पसरली. अन् ही नाराजी आज कोल्हापूरच्या रस्त्यांवर दिसून आली. शिवसेनेचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा काढला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. खासदारसाहेब, तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? सांगा शिवसैनिकांचं काय चुकलं?,असे प्रश्न विचारण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा
कोल्हापूरच्या हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला. त्यानंतर कोल्हापुरात नाराजी पसरली. अन् ही नाराजी आज कोल्हापूरच्या रस्त्यांवर दिसून आली. शिवसेनेचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांनी धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा काढला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. खासदारसाहेब, तुम्ही उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? सांगा शिवसैनिकांचं काय चुकलं?,असे प्रश्न विचारण्यात आले.
शिवसैनिकांना घेतलं ताब्यात
आक्रमक शिवसैनिक जेव्हा धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा काढला. तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मानेंच्या घरी पोहोचण्याआधीच शिसैनिकांना अडवण्यात आलं. आक्रमक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
खोतकर शिंदेगटात जाणार?
तर दुसरीकडे मराठवाड्यातील शिवसेनेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर एकनाथ शिंदे गटात शामिल झाले आहेत. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. खोतकर आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच मी शिवसेनेतच राहणार असे म्हणणाऱ्या अर्जुन खोतकर यांनी आता एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत एकनाथ शिंदे आणि खोतकर यांच्या भेटीचा एक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर खोतकरांनी शिंदे गटात जाण्याच्या शक्यता नाकारल्या होत्या. आज पुन्हा एकदा अर्जुन खोतकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला रवाना झाले. या भेटींतच खोतकरांचा शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे
