Kolhapur : कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, प्रस्थापितांचं टेन्शन वाढलं, हरकती नोंदवण्याचं आवाहन

राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची (Municipal Corporation) प्रारुप प्रभाग रचना,आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

Kolhapur : कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, प्रस्थापितांचं टेन्शन वाढलं, हरकती नोंदवण्याचं आवाहन
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 10:14 AM

कोल्हापूर : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची (Municipal Corporation) प्रारुप प्रभाग रचना,आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. कोल्हापूर (Kolhapur) महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना जाहीर केली आहे. या प्रभाग रचनेमुळे कोल्हापूरमध्ये नगरसेवकांची संख्या 11 नं वाढलेली आहे. यामुळे कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांचे संख्या 81 वरून 92 वर पोहोचली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्याने कोल्हापुरातील राजकीय पक्ष काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, ताराराणी आघाडी येत्या काळात निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महापालिकेसाठी आरक्षण देखील जाहीर झाला असून 79 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी, अनुसूचित जाती प्रवर्ग 12 जागा तर अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची राज्य सरकारची तयारी नाही असे दिसतेय. राज्य निवडणूक आयोगाने प्रथम प्रभाग रचना निश्चित करायला सांगितले आहे. त्यामुळे 8 फेब्रुवारी रोजी ओबीसी आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टात जाहीर झाल्यानंतर या संदर्भातील अंतिम निर्णय पुढील वेळी जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरमध्ये प्रस्थापितांना धक्का?

कोल्हापूर महापालिकेने प्रभाग प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतर अनेक प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसलेला आहे. प्रस्थापित नगरसेवकांचे हक्काचे प्रभाग फुटल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बहूसदस्यीयप्रभाग असल्यामुळे जुन्या प्रभागाचा विस्तार झाल्याचे देखील समोर आले आहे. प्रशासनाने 14 फेब्रुवारी पर्यंत प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याचा आवाहन देखील केलं.

प्रशासकांकडे कारभार

कोल्हापूर महापालिकेची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली असून इथं प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. यापूर्वी महापालिका निवडणूक एक सदस्य प्रभागरचना पद्धतीने घेण्यात येणार होती. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयानुसार कोल्हापूरमधील महापालिका निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग रचना नुसार होत आहे. 31 प्रभागांमध्ये 92 नगरसेवक असतील.

कोल्हापूर महापालिकेतील गेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल

कोल्हापूर महापालिकेत 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 30, राष्ट्रवादीने 14, भाजपने 15, ताराराणी या आघाडीने 18 तर शिवसेनेने 4 जागांवर विजय मिळवला होता. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली होती, त्यांच्या सोबत शिवसेना देखील सत्तेत सहभागी झाली होती.

इतर बातम्या:

एक राष्ट्र एक डिजिटल आयडी, पॅन, आधार कार्ड, वाहन परवान्यासह पासपोर्ट एकत्रित गुंफणार

Amravati | वाघांची डरकाळी, रुबाब पुन्हा अनुभवायला मिळणार ! , मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी सह चिखलदऱ्यातील पर्यटनही सुरू

Kolhapur Municipal Corporation declare ward draft for upcoming election

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.