AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी झिंगूर तर त्या सरडा… त्या बाईचं… आष्टीकरांच्या मुलाची सुषमा अंधारेंवर जोरदार टीका; वाद पेटणार?

Krishna Ashtikar : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर कृष्णा आष्टीकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘मी झिंगूर तर त्या सरडा’ असे म्हणत त्यांनी अंधारेंवर सडकून टीका केली. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मी झिंगूर तर त्या सरडा... त्या बाईचं... आष्टीकरांच्या मुलाची सुषमा अंधारेंवर जोरदार टीका; वाद पेटणार?
Andhare vs AshtikarImage Credit source: Google
| Updated on: Jun 20, 2026 | 7:38 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश आहे. मात्र नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा आणि हिंगोली-परभणीचे विधान परिषेदेचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी आपण उद्धव ठाकरेंसबोबत असल्याचा दावा केला आहे. यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कृष्णा आष्टीकर यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरेंसोबतची निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वत:चाच वडिलांचे पिंडदान करावे. उद्याच त्यांनी पिंडदान करून बापाच्या प्रतिमेला जोडे मारावेत. मग आम्ही म्हणून की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत खरोखरच आहात असं म्हणत कृष्णा यांचा उल्लेख झिंगूर असा केला होता. यावर आता कृष्णा आष्टीकर यांनी उत्तर दिले आहे.

कृष्णा आष्टीकर यांची अंधारेंवर सडकून टीका

कृष्णा आष्टीकर यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेवर बोलताना म्हटले की, ‘असभ्य, जिभेचा आजार झालेल्या बाईला परत परत उत्तर देणार नाही. त्यांनी मला झिंगूर म्हटले असेल तर ते सरडा आहेत. बाळासाहेब, उद्धव साहेब, आदित्य साहेब यांच्या बद्दल ही बाई काय काय बोलली होती. ते सर्व बाजूला ठेवून आम्ही या बाईला स्वीकारलं होत. हिंदू देव-देवतांवर ही बाई काय काय बोलली होती ते सगळं आम्ही बाजूला ठेवलं होतं. आज ही बाई आम्हाला धर्माबद्दल नीतीबद्दल शिकवत आहेत. जुनं मलाही काढता येतं. वयाने लहान आहे म्हणून आपला आदर करतोय. गृहीत धरायचं कारण नाही त्या सुशिक्षित असतील तर आम्ही काही अडाणी नाही. बोलता आम्हाला येतं परंतु आम्ही तुमच्यासारखी पातळी घसरू दिली नाही. तुम्ही बोलत जा आणि त्या गोष्टी किती सुसंस्कृत आहेत हे महाराष्ट्र ठरवेल.’

वडिलांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन…

सुषमा अंधारे यांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याबाबत भाष्य केले होते. यावर बोलताना कृष्णा यांनी म्हटले की, बाळासाहेब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या बद्दल तुम्ही किती बोलला होतात मग या अगोदर यांना किती जोडे मारायला पाहिजे होते? मी माझ्या वडिलांना जोडे मारो आंदोलन करणार नाही. हिंदू धर्मामध्ये वडिलांच्या पाया पडले जाते. त्यांना कुठल्याही स्वरूपात जोडे मारल्या जात नाहीत. एका मुलाला आपल्या बापाला जोडे मारायला लावते म्हणजे त्या बाईची मानसिकता कळते. आपण बोलताना कुणाबद्दल बोलतोय त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीसोबत काय नात आहे हे तपासून बोलावं. पक्षाची जी वाहतात सुरू आहे यासाठी ही बाई जबाबदार आहे.

पुढे बोलताना कृष्णा पाटील म्हणाले की, ‘सुषमा अंधारे यांनी स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे. या बाईला मानसिक आजार झालेला आहे. मानसिक आजारांच्या गोळ्या त्यांनी सुरू कराव्यात. त्यांनी कुठेतरी दाखवून घ्यावं, नसेल तर माझ्याकडे मानसोपचार तज्ञ आहे. तसं पाहिलं तर ते आता पुण्यामध्ये राहत आहेत येरवडा जवळच आहे. येरवडामध्ये जाऊन एक दोन वेळा शॉक घेतला तर त्या व्यवस्थित होतील. मी आजही तुम्हाला ताई, बाई असंच म्हणून बोलत आहे. कुठेतरी तोंड सांभाळून बोला. मी माझी भूमिका स्पष्ट केलेली होती. मी आघाडी सोबतच आहे. जर ही बाई अशी बोलत असेल तर मी राजकारण बंद करेल.’

वडिलांचं श्राद्ध…

सुषमा अंधारे यांनी वडिलांचं श्राद्ध घालण्याची भाषा केली होती. यावर बोलताना कृष्णा आष्टीकर यांनी म्हटले की, माणूस मेल्यावर श्राद्ध घातलं जातं. वर्षभरापूर्वीच मी माझी आई गमावली आहे. वर्षही झालं नाही मी माझ्या आईचं श्राद्ध घातल आहे. मी तर म्हणतो या बाईचा सामूहिक श्राद्ध घातलं पाहिजे. या बाईने ज्या दिवशी हिंदू देवी देवतांबद्दल बोलली त्यादिवशी ही बाई मेली. या बाईचे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे आहेत. जर ही बाई अशीच बोलत राहिली तर मला विचार करावा लागेल. वैचारिक पातळीवर आपला विरोध असला पाहिजे. एका पोराला सांगताय तुम्ही बापाचं श्राद्ध घाला म्हणून. तुमच्या पोराचं तुम्ही श्राद्ध घाला. ही बाई तर मला शिवसेनेतून हाकलायला लागली आहे.

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग