AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वहिनींचे सर्व लाड पुरवता, भाऊराया,आता तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का?; 92 लाख महिला अपात्र ठरताच महिला नेत्याचा सरकारवर हल्ला

महाराष्ट्र शासनाच्या बहुचर्चित 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'तून धक्कादायक बाब समोर आली आहे. ई-केवायसी आणि पडताळणीनंतर तब्बल ९२ लाखांहून अधिक महिला लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्या आहेत, ज्यामुळे त्यांचा दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता बंद झाला आहे. या निर्णयामुळे मोठा राजकीय वादळ उठले असून, विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

वहिनींचे सर्व लाड पुरवता, भाऊराया,आता तुम्हाला लाडक्या बहिणी 'जड' झाल्यात का?; 92 लाख महिला अपात्र ठरताच महिला नेत्याचा सरकारवर हल्ला
लाडकी बहीण योजनेवरू महिला नेत्याचा सरकारवर हल्ला
| Updated on: Jul 13, 2026 | 12:14 PM
Share

राज्यातील महायुती सरकारची बहुचर्चित, महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मोठा गाजावाज सुरू करत झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण जसजसा काळ पुढे गेला, तसतसे फसवणुकीचे अनेक प्रकार उघड झाले, त्यानंतर ईकेवायसी लागू करण्यात आली, पडताळणी सुरू झाली. आता याच लाडीक बहीण योजनेबद्दल मोठी अपड़ेट समोर आली आहे. या योजनेतून अनेक महिलांची नाव वगळण्यात आली आहेत मात्र आता थोड्याथोडक्याा  नव्हे तर तब्बल 92 लाख बहिणींचा हप्ता बंद होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेनंतर लाभार्थी यादीतून तब्बल 92 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आली आहेत.

यामुळे मोठी खळबळ माजली असून लाडक्या बहिणींसाठी हा मोठा धक्का आहे. मात्र याच मुद्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरलं असून अनेकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या, रोहिणी खडसे यांनी तर ट्विट करत सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच विजय वडेट्टीवार यांनीही सरकारला सुनावलं आहे.

रोहिणी खडसे यांचा हल्लाबोल

तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का ? वहिनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीचं नको झाल्यात का ? असा डायकरेक्ट सवालच खडसे यांनी विचारला आहे. X वर एक मोठी पोस्ट रोहिणी खडसे यांनी केली आहे.

काय आहे रोहिणी खडसे यांची पोस्ट ?

काही महिन्यांपूर्वी ८० लाख पेक्षा अधिक महिला लाडकी बहिण योजनेतून बाद करण्यात आल्या होत्या. आता महिन्याभराने आणखी १२ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आले आहे. असं करून सरकारने तब्बल ९२ लाख महिलांना अपात्र केलं आहे.

सरकारमधील लोक सांगतात की लाडक्या बहिणींचा खर्च २६ हजार १९७.७८ कोटींवरून ३३ हजार ६९७ कोटींवर गेला आहे. लाडक्या बहिणींवर ७५०० कोटींचा खर्च वाढला आहे.

काय ओ भाऊ राया, @CMOMaharashtra

@mieknathshinde . आता तुम्हाला लाडक्या बहिणींचा खर्च दिसतोय ? आता तुम्हाला लाडक्या बहिणी ‘जड’ झाल्यात का ? वहिंनींचे सगळे हट्ट, सगळे लाड पुरवता, मग तुम्हाला लाडक्या बहिणीच नको झाल्यात का ?

लाडक्या बहिणींचा खंबीर ‘दादा’ आता नाही पण किमान सुनेत्रा वहिनी तुम्ही तरी लाडक्या बहिणींवर होणारा अन्याय मांडा !

असं रोहिणी खडसे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर टीकेचा आसूड ओढला आहे. राजकीय हित साध्य झाले… आता लाडक्या बहिणींना विसरले! असं म्हणत वडेट्टीवार यांनीही X वर लाडकी बहीण संदर्भात ट्विट केलं आहे.

विजय वडेट्टीवार यांची पोस्ट काय ?

निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणी म्हणून ज्या महिलांना डोक्यावर घेतले, त्याच महिलांना सत्ता मिळताच योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. तब्बल ९२ लाख महिलांना योजनेतूनi वगळण्याचा निर्णय हा महिलांच्या विश्वासघाताचा आणि राजकीय स्वार्थाचा कळस आहे.

सत्ता मिळवण्यासाठी कोणतीही शहानिशा न करता सरसकट लाभ वाटण्यात आला, पण आता वेगवेगळे निकष लावून महिलांना अपात्र ठरवले जात आहे. जर त्या महिला अपात्र होत्या, तर त्यांना आधी लाभ का देण्यात आला? आणि जर त्या पात्र होत्या, तर आता त्यांना वगळण्याचे कारण काय? या योजनेवर १४ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला. या पैशांच्या नियोजनातील गोंधळ, चुकीचे निकष आणि राजकीय फायद्यासाठी केलेल्या निर्णयांचा हिशोब कोण देणार?

महिलांच्या भावनांशी खेळ करून, त्यांच्या नावावर राजकारण करून आणि सत्ता मिळताच त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. लाडक्या बहिणींसाठी नव्हे, तर मतांसाठी योजना होती का? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे!, असं वडेट्टीवार यांनी लिहीलं आहे.

Follow Us
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?
देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! शरद पवारांनाही टाकले मागे
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही टाकले मागे
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिरवा कंदील मिळणर?
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी छाननी
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
Jejuri Vari Accident | भंडाऱ्याच्या उत्साहात काळाचा घाला! जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल