AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: ‘रोको’ मैदान गाजवण्यासाठी सज्ज, विराट-रोहितचा झंझावात किती वाजता सुरु होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील वेळा ही वेगवेगळ्या असणार आहे. तीन वनडे सामने तीन वेगवेगळ्या वेळेला रंगतील. तर वेळापत्रक पाहा...

IND vs ENG: 'रोको' मैदान गाजवण्यासाठी सज्ज, विराट-रोहितचा झंझावात किती वाजता सुरु होणार?
virat rohit
| Updated on: Jul 13, 2026 | 12:03 PM
Share

भारत आणि इंग्लंड आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेनंतर तीन दिवसांनी ही मालिका सुरू होईल. इंग्लंडने टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 4-0 ने जिंकली होती. आता, एकदिवसीय मालिका जिंकून आपल्या विजयाचा बदला घेण्याची संधी भारताला मिळेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामने 14, 16 आणि 19 जुलै रोजी होणार आहेत. ही मालिका 2027 च्या विश्वचषकासाठीही महत्त्वपूर्ण ठरेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे स्टार खेळाडू जवळपास सहा महिन्यांनंतर पुन्हा एकत्र खेळताना दिसतील. जसप्रीत बुमराह बऱ्याच कालावधीनंतर या फॉरमॅटमध्ये पुनरागमन करेल. शुभमन गिल एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करेल, तर हॅरी ब्रूक पुन्हा एकदा या फॉरमॅटमध्ये इंग्लंडचे कर्णधारपद भूषवेल.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका बर्मिंगहॅम, कार्डिफ आणि लॉर्ड्स येथे खेळवली जाईल. भारतीय संघाने आपल्या मागील दौऱ्यात लॉर्ड्सवर एकदिवसीय सामना खेळला होता. हा संघ सात वर्षांनंतर बर्मिंगहॅममध्ये खेळणार आहे, तर कार्डिफ 12 वर्षांनंतर एकदिवसीय सामन्याचे आयोजन करेल. टी-20 सामन्यांच्या वेळेत जसा बदल होता तसाच वनडेसाठीही वेळेत बदल आहे.

भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेची वेळ भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या दोन वेगवेगळ्या वेळा आहेत. पहिला आणि तिसरा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30  वाजता सुरू होणार आहे. कार्डिफमधील दुसरा एकदिवसीय सामना सायंकाळी 5:30 वाजता खेळला जाईल. तर तिसरा सामना हा 3:30 वाजता रंगेल.

भारतीय एकदिवसीय संघ शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव.

इंग्लंड एकदिवसीय संघ हॅरी ब्रूक (कर्णधार), टॉम बँटन, जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन डकेट, जो रूट, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, सॅम करन, लियाम डॉसन, विल जॅक्स, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, जोश टंग, साकिब महमूद.

Follow Us
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली