AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांनी मराठीची मोहीम केराच्या टोपलीत टाकली; संजय राऊत यांचा घणाघात

संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधत म्हटले की, अमित शाहांनी मराठी भाषा शिकवण्याची मोहीम अक्षरशः केराच्या टोपलीत टाकली. दिल्लीच्या दबावाखाली शिंदे गट काम करत असून, शाहांनी घेतलेल्या या निर्णयावर त्यांनी चकार शब्दही काढला नाही, यावरून त्यांचा पक्ष अमित शाहच चालवतात हे उघड झाले आहे. ही मराठी माणसाची शोकांतिका आहे, असे राऊत म्हणाले.

अमित शाह यांनी मराठीची मोहीम केराच्या टोपलीत टाकली; संजय राऊत यांचा घणाघात
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2026 | 10:34 AM
Share

राज्य सरकारने अमराठींना मराठी शिकण्यासाठी मोहीम हाती गेतली होती. पण दिल्लीतून सूत्रे हलली अन् अमित शाह यांनी मराठीची मोहीम केराच्या टोपलीत टाकली. तुम्ही त्यावर तोंडही उघडू शकला नाही. यातून तुमचा पक्ष अमित शाह हेच चालवतात हे उघड झालं आहे, असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिवहन खात्याचा निर्णय पुढे ढकलून मीच तुमचा बॉस असल्याचं दाखवून दिलं आहे, असा दावाही राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला.

दिल्लीतून सूत्र हलवली जातात. त्यांच्या पक्षाचे नेते अमित शाह आहेत, असं मी काल म्हणालो होतो. त्यानुसार घडलं. मराठी भाषा आली पाहिजे, यासाठी परिवहन मंत्र्याने प्रचार केला. मुलाखती दिल्या. वर्ग सुरू केले. कारवाईच्या सूचना दिल्या. अर्थात मराठी आली पाहिजे हा धोरणात्मक निर्णय आहे. ही बाळासाहेबांच्या मूळ शिवसेनेची भूमिका आहे. ती काही शिंदे गटाची भूमिका नाही. एक निर्णय घेतला, तो राबवत असताना पावलं टाकल्यावर शेपूट का घातलं? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

हे मराठी माणसाचं दुर्देव

मराठीसाठी मंत्रिपद गेलं तरी चालेल, असं तुम्ही म्हटलं पाहिजे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारधारेच्या गोष्टी करतात. त्यांनी म्हटलं पाहिजे अमित शाह यांचा निर्णय मानणार नाही. आधी तीन तीन महिने आणि आता एक वर्षाने मराठी शिकण्यासाठी मुदत वाढवली आहे. मराठीची मोहीम अखेर अमित शाह यांनी केराच्या टोपलीत टाकली. तुमचा पक्ष अमित शाह चालवतात हे उघड झालं. या निर्णयानंतर तुम्ही तोंड उघडलं नाही. हे मराठी माणसाचं दुर्देव आहे, असं राऊत म्हणाले.

अन् बांबू घातला

प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे. ही चळवळ शिवसेनेने सुरू केली होती. रिक्षा चालकांचा रोजचा संबंध जनतेशी येतो. त्यांना मराठी आलीच पाहिजे. परिवहन मंत्र्यांनी ही चळवळ सुरू केली. ती किती टोकाला जाईल याबाबत साशंकता होती. दिल्लीतून बांबू येईल. तो बांबू जाईल. हे माघार घेतील. तसा बांबू आला. मुख्यमंत्र्यांच्या हाती बांबू आला आणि त्यांनी बांबू घातला असं म्हणता येईल. मुख्यमंत्र्यांचा आदेश त्यांना मान्य आहे, असं ऐकलं. अशी जोरदार कॅम्पेन करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती का? तुमचे पक्षप्रमुख अमित शाहांशी चर्चा केली होती का? हे स्पष्ट केलं पाहिजे, असा आव्हानच त्यांनी दिलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपणच बॉस असल्याचंही दाखवून दिलं, असा दावाही त्यांनी केला.

Follow Us
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप