महाविजेते ! तब्बल 5 लाखांचं लीड घेणारे खासदार

मुबई : पतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात रेकॉर्ड ब्रेक करत भाजपाने बहुमत मिळवले आहे. भाजपला यंदा 2014 पेक्षाही अधिक जागा मिळवण्यात यश मिळाले आहे. एकट्या भाजपने 300 चा आकडा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शाहपर्यंत असे अनेक उमेदवार आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघात मोठं बहुमत मिळवलं आहे. याशिवाय फरिदाबाद येथून केंद्रीय मंत्री कृष्ण …

महाविजेते ! तब्बल 5 लाखांचं लीड घेणारे खासदार

मुबई : पतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात रेकॉर्ड ब्रेक करत भाजपाने बहुमत मिळवले आहे. भाजपला यंदा 2014 पेक्षाही अधिक जागा मिळवण्यात यश मिळाले आहे. एकट्या भाजपने 300 चा आकडा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमित शाहपर्यंत असे अनेक उमेदवार आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघात मोठं बहुमत मिळवलं आहे. याशिवाय फरिदाबाद येथून केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर आणि गुजरातच्या नवसारी जागेवरुन भाजपचे सी. आर. पाटील हे मोठ्या संख्येने निवडणूकीत विजयी झाले आहेत. या लिस्टमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या नावाचाही समावेश आहे. राहुल यांनी केरळमधून 4 लाख 31 हजार 770 मतं मिळवली आहेत.

सी. आर. पाटील (नवसारी)

पंतप्रधान मोदींचे राज्य गुजरातमध्ये भाजपला सर्वात मोठा विजय मिळाल आहे. गुजरातच्या नवसारी जागेवर भाजप उमेदवार सी आर पाटील यांनी 6 लाख 89 हजार 668 मतांच्या फरकांनी विजय मिळवला आहे. सी आर पाटलांच्या विरोधात काँग्रसचे धर्मेश भाई पटेल होते. पण निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला 2 लाख 83 हजार 071 मतं मिळालेली आहेत. भाजपा उमेदवाराला तब्बल 9 लाख 69 हजार 430 मतं मिळाली आहेत.

संजय भाटिया (करनाल)

हरयाणातही भाजपने शानदार प्रदर्शन केले आहे. हरयाणामध्ये भाजपाने विरोधी पक्षाचा सुपडासाफ केला आहे. येथील करनाल जागेवर भाजपच्या संजय भाटिया यांनी 6 लाख 56 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या कुलदीप शर्मांचा पराभव केला, त्यांना 2 लाख 55 हजार 452 मतं मिळाली होती.

कृष्णपाल गुर्जल (फरीदाबाद)

हरयाणातील फरीदाबाद जागेवरुन भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी मेठ्या मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार अवतार सिंह भडाना यांचा 6 लाख 38 हजार 239 फरकाने पराभव केला आहे. काँग्रेसने नुकतेच भडाना यांना पक्षात घेतले होते आणि फरिदाबा येथून तिकिट दिले होते. या जागेवरुन भडाना फक्त 2 लाख 74 हजार 983 मतांवी पराभूत झाले आहे. गुर्जर यांच्या गेल्यावेळीही याच जागेवरुन विजय झाला होता.

सुभाष चंद्र (भीलवाडा)

राजस्थान निवणुकीच्या निकालात भीलवाडा जागेवर भाजपच्या सुभाष चंद्रा यांचा मोठा विजय झाला आहे. चंद्रा यांनी काँग्रेस उमेदवार राम पाल शर्मा यांचा 6 लाख 12 हजारांनी पराभव केला आहे. भीलवाडा येथून भाजपला 9 लाख 38 हजार 160 मतं मिळाली आहेत.

दर्शना जर्दोश (सूरत)

गुजरातमध्ये भाजपने अजून एक मोठा विजय मिळवला आहे. सुरत लोकसभा जागेवर भाजपच्या दर्शना जर्दोश यांनी 5 लाख 48 हजार 230 मतांच्या फरकांनी विजय मिळवला आहे. दर्शना यांना 7 लाख 94 हजार 133 मतं पडली आहेत. तर काँग्रेस उमेदवाराला 2 लाख 47 हजार 421 मतं मिळाली आहेत.

अमित शाह (गांधीनगर)

भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या खाद्यांवर भारतात भाजपला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. पण त्यांनी आपल्या लोकसभा जागेवरही मोठा विजय मिळवला आहे. गांधीनगर जागेवर अमित शाह यांनी 5 लाख 57 हजार 014 मतांच्या फरकाने विजय मिळवला. शाह यांना एकूण 8 लाख 94 हजार 624 मतं मिळाली आहेत. शाहांच्या विरोधात उभा असलेल्या काँग्रेस उमेदवार सी. जी. चावडा यांना 3 लाख 37 हजार 610 मतं मिळाले आहेत. शाह पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

राहुल गांधी (वायनाड)

मोठा विजय मिळवण्यात भाजप नेत्यांशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही पुढे आहेत. राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून पराभव पत्कारावा लागला. पण पहिल्यांदा दोन जागेवरुन निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेस अध्यक्षांचा केरळच्या वायनाड जागेवर मोठा विजय झाला आहे. राहुल गांधी यांनी सीपीआय उमेदवार पी. पी. सुनीर यांचा 4 लाख 31 हजार 770 मतांच्या फरकाने पराभूत केले. राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाची कामगिरी यंदाच्या निवडणुकीत निराशाजनक राहिली आहे. केरळ, पंजाब आणि तामिळनाडू सोडले तर पक्षाने इतर कोणत्याही राज्यात चांगली कामगिरी केली नाही.

दिल्लीचे दिलेर

दिल्लीच्या सर्व सात लोकसभा जागेवर भाजपाने कब्जा मिळवला आहे. येथील पाच जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दोन जागांवर आम आदमी पार्टीचे उमेदवार तीन नंबरवर आहेत. पश्चिम दिल्लीच्या जागेवर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वर्मा यांना मोठा विजय मिळाला आहे आणि त्यांनी काँग्रेसच्या महाबल मिश्रा यांचा 5 लाख 78 हजार 486 मतांनी पराभव केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *