LIVE : माजी खासदार मिलिंद देवरा यांचं सोनिया गांधींना पत्र

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज

  • Updated On - 10:00 am, Tue, 28 January 20
LIVE : माजी खासदार मिलिंद देवरा यांचं सोनिया गांधींना पत्र

[svt-event title=”राज्यात जानेवारी अखेरपर्यत थंडीचा मुक्काम” date=”28/01/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] राज्यात दोन दिवसांनंतर पुन्हा कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्याने जानेवारी अखेरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात थंडी कायम राहणार आहे. दरम्यान, मंगळवारी (28 जानेवारी) कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून सध्या उष्ण वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाले आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांचा वेग आता कमी होत आहे. त्यातच काही भागात ढगाळ हवामानाची स्थिती निर्माण होत असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. [/svt-event]

[svt-event title=”मिलिंद देवरा यांचं सोनिया गांधींना पत्र” date=”28/01/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] लोकसभा-विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सूचना करण्याची मागणी, मार्च 2019 मध्ये राहुल गांधी यांनी निवडणूक कालावधीत रॅलीदरम्यान गरिबांना 500 स्क्वेअर फुटांचे घर देण्याचे आश्वासन दिले होते, महाविकास आघाडी राज्यात चांगलं काम करीत आहे, मात्र काँग्रेसकडून आश्वासन पूर्तता लवकर करण्यात याव्यात अशी देवरांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”लातुरात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन” date=”28/01/2020,9:51AM” class=”svt-cd-green” ] लातूर – कॉलेज प्रशासनाविरोधात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सलग दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच, रात्रीही आंदोलनकर्ते विद्यार्थी–विद्यार्थिनी कॉलेजच्या गेटवरच झोपले, वसतिगृहातील अपुऱ्या सुविधा आणि कॉलेज प्रशासनाची मनमानी याविरोधात आंदोलन, कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंपुढेच मागण्या मांडण्याचा विद्यार्थ्यांचा आग्रह, विद्यार्थी आंदोलन करीत असताना रात्री 7 नंतर हॉस्टेल बंद करण्यात आल्याची विद्यार्थ्यांची माहिती. [/svt-event]

[svt-event title=”महाविकास आघाडी सरकारचं काम घटनेनुसारच : नवाब मलिक” date=”28/01/2020,9:50AM” class=”svt-cd-green” ] मुंबई – किमान समान कार्यक्रमाद्वारे आणि घटनेनुसार सरकार काम करणार, तीन पक्ष त्यानुसार काम करत आहे, कोणालाही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, सीएए संदर्भात बाहेरील देशांचा हस्तक्षेप मंजूर नाही, सरकारने आंदेलन कर्त्यांशी संवाद साधून मार्ग काढला पाहिजे परंतु सरकार यासंदर्भात दिरंगाई करत आहे, सरकारची जबाबदारी आहे की काही निर्णय घेऊन लवकरात लवकर मार्ग काढावा, अनुराग ठाकूर यांनी जे जनतेला जोडे मारा असं वक्तव्य केलं त्यांना दिल्लीतील जनता निवडणुकीत धडा शिकवेल – नवाब मलिक [/svt-event]