मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार

मावळ मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण, पनवेल हे विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झाला आहे. याची भोगोलिक परिस्थिती पाहता हा मतदारसंघ हा मतदारांशी सवांद साधण्यासाठी अतिशय अवघड असा आहे. यावेळी शिवसेना हॅटट्रिक करणार की राष्ट्रवादी काँग्रेस सेनेचा बालेकिल्ला हिसकावून घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून […]

मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मावळ मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण, पनवेल हे विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झाला आहे. याची भोगोलिक परिस्थिती पाहता हा मतदारसंघ हा मतदारांशी सवांद साधण्यासाठी अतिशय अवघड असा आहे. यावेळी शिवसेना हॅटट्रिक करणार की राष्ट्रवादी काँग्रेस सेनेचा बालेकिल्ला हिसकावून घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. लक्ष्मण जगताप (भाजपा), संजोग वाघिरे (राष्ट्रवादी कांग्रेस), माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे खासदार बारणे यांचे संभाव्य प्रतिस्पर्धी असतील. त्यात पार्थ पवार यांचे आव्हान सगळ्यात कठीण मानले जात आहे. कारण पार्थ पवार यांनी आव्हान म्हणजे थेट अजित पवारांशी पंगा, अशी एकंदरीत स्थिती आहे. त्यामुळे जर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे आले, तर मोठमोठे उमेदवार सुद्धा उमेदवारीवर पुनर्विचार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाची रचना आणि सद्यस्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यात विभागला गेला आहे. पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघांचा मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ बनला आहे.

  • पिंपरी (पुणे) – गौतम चाबुकस्वार, शिवसेना
  • चिंचवड (पुणे) – लक्ष्मण जगताप, भाजपा
  • मावळ (पुणे) – संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा
  • कर्जत (रायगड) – आ. सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
  • उरण (रायगड) – आ. मनोहर भोईर, शिवसेना.
  • पनवेल (रायगड) – आ. प्रशांत ठाकूर, भाजपा

पिंपरी चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील सहा मतदार संघाचा मावळ लोकसभा मतदार संघ बनलाय. त्यामुळे साहजिकच इथल्या समस्याही वेगळ्या आहेत. रायगड हा कोकणातला भाग आहे, त्यामुळे कोकणातल्या ज्या समस्या आहेत, त्याच समस्या इथल्या लोकांना आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या समस्या वेगळ्याच आहेत.

शिवसेनेचा बालेकिल्ल्याला आता पार्थ पवारांचं आव्हान?

मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा गेल्या 10 वर्षीपासून फडकत आहे. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उडी घेतलेली पहायला मिळत आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे या मतदारसंघामधून लढण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरामधील राजकारणात पार्थ पवार सक्रीय झाल्याचे समोर आले आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांचे पुत्र मावळ लोकसभा मतदारसंघात उतरणार म्हणल्यावर मावळमधील बहुतांश दिगग्ज उमेदवारांनी आपली तलवार आधीच म्यान केलेली दिसत आहे. पार्थ पवार म्हणजेच पर्यायाने अजित पवार यांच्यासोबत लढत करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप असतील किंवा अन्य पक्षांचे उमेदवार असतील यांनी सपशेल माघार घेतलेली दिसत आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने अजित पवार यांना अंगावर घेणे जड जाणार या उद्देशाने यांनी आपली तलवार म्यान केलेली दिसत आहे.

सेना-भाजप युती झाली, तर….

जर भविष्यात शिवसेना-भाजप युती झाली तर आणि शिवसेनले मावळ लोकसभा मतदारसंघ सेनेला गेला, तर सेनेचा उमेदवार हा दुबळा ठरुन त्यांचा पराभव देखील होऊ शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचेही भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघामधील प्रमुख समस्या 

मावळ मतदारसंघात प्रामुख्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रिंगरोडचा मुद्दा येणाऱ्या लोकसभेला गाजण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजलेली पवना धरण बंद जलवाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मावळ मधील लोकांचा या बंद जलवाहिनी विरुद्ध मोठा जनआक्रोश बाहेर येणार आहे, या बंद जलवाहिनी काही दिवसांपूर्वी मावळ मध्ये या प्रकल्पा विरुद्ध मोठे जनआंदोलन उभे केले होते त्या मध्ये या आंदोलनात तीन शेतकऱ्याचा मृत्यू देखील झाला होता हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होऊ शकतो.

मावळ लोकसभा मतदार संघावर पगडा आहे, तो पिंपरी चिंचवडचा. वास्तविक पाहता पिंपरी चिंचवडमधल्या लोकांना मुंबई, लोणावळा इथे जाण्यासाठी अधिक ट्रेनची आवश्यकता आहे. या फेऱ्या वाढाव्यात आणि त्याच बरोबर ट्रॅक वाढवले जावेत ही मागणी गेली कित्येक वर्षे केली जाते आहे. पण या बाबतीत बारणे यांच्याकडून ठोस कामगिरी झाली नसल्याचे स्पष्ट आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणारी अनेक घरे ही संरक्षण विभागाच्या हद्दीत अर्थात रेड झोनमध्ये येतात. हा प्रश्न संरक्षण विभागाशी निगडीत असल्यान बारणे यांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी पावले उचलणे गरजेचे होते. पण त्यावर अजून तोडगा निघालेला नाही.

श्रीरंग बारणे, विद्यमान शिवसेना खासदार

पिंपरी चिंचवडच्या दृष्टीने मावळची बंद पाईपलाईन योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेमुळे शहराची पाण्याची समस्या पुरती मिटणार आहे. पण या योजनेला मावळ विधानसभा मतदार संघातल्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या योजनेचे समर्थक आणि विरोधक मतदार संघात येत असल्यामूळे बारणे यांनी कधी ही स्पष्ट भूमिका घेवून सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला नाही. लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या बोपखेल किंवा रक्षक रस्त्या संदर्भात ही बारणे यांनी काही केली नसल्याची टीका केली जातेय.

मावळ मतदारसंघाच्या रायगडमधील भागाच्या काय समस्या आहेत?

रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा विचार केला, तर या उरण येथील जेएनपीटीचे प्रकल्पग्रस्त, CWC मधील स्थानिकांच्या नोक-या, पनवेल – उरण लोकल रेल्वे, पनवेल – कर्जत लोकल सेवा, रसायनीतील HOC मधील प्रकल्प ग्रस्त अद्यापही न्याय हक्कासाठी झगडत आहे, HOC प्रकल्प बंद झाला परंतु त्यावरील 1600 एकर जागेवर पुन्हा HP कपंनीचा बाँटलीगं प्लांटला स्थानिक व प्रकल्पग्रस्तांचा असलेला विरोधाला कधीही विद्यमान खासदार अप्पा बारणे सामोरे गेले नाही. कधीही या बाबतीत केद्रींय स्तरावरील अधिकाऱ्यांना जमिनी हकीगत हाताळण्यास पाठपुरावा केला नाही.

उरणमधील जेएनपीटीमध्ये स्थानिकांच्या जमिनी गेल्यात, स्थानिकांचा रोजगार बुडाला आहे. मात्र, यावर सदस्यपदी परप्रांतीय असलेल्या स्थानिकाची वर्णी लागली, तरीही खासदार गप्पच आहेत. याविषयी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांमध्ये आक्रोश आहे. मुबंई-पुणे एक्सप्रेस हायवे हा पूर्णपणे मावळ मतदार सघांतून जातो. म्हणजेच पनवेल तालुक्यातील कंळबोली ते पिपंरी चिचंवडच्या पुण्याकडील वेशीपर्यंत हा रस्ता आहे. यावर रोजच होणारे अपघातातील जखमी व मृतांना अद्याप ही 15 वर्षांनतंरही खाजगी रुग्णालय सेवेवर अवंलबून राहावे लागते. दुर्तगती मार्गावर MSRDC चे स्वत:चे ट्रामा सेंटर किवां मोठ्या रुग्णालयाची मागणी होत आहे. मात्र, खासदार बारणे यांनी कधीही या सदंर्भात स्थानिक लोकप्रतिनीधींना एकत्र आणून या मागणीचा विचारच केला नाही.

रायगड जिल्ह्यातील खालापूर व कर्जत तालुक्यातुन केंद्रीय पेट्रोलियम कंपनी HP तसेच खाजगी कंपनी रिलायन्सची गॅस वितरण पाईपलाईन गेली. यामध्ये अनेक शेतकरी भरडले गेले. मात्र खा. बारणे यांनी शेतकऱ्यांकडे परस्पर दुर्लक्ष केले याचाही राग शेतकऱ्यांमध्ये आहे.

तसेच, पुणे जिल्ह्यातील लोणालळा ते रायगड मधील कर्जत दरम्यान मध्यरेल्वे वरील पॅसेजंर फेऱ्या वाढविण्याची दोन्ही जिल्ह्यातील जनतेची मागणी असून त्याकडे खासदार बारणे यांनी लक्ष दिले नाही. तसेच रस्ते, रेल्वे आणि वीज या एकाही प्रश्नाला बारणे यांनी हात घातलेला नाही. आदिवासी भागात ते फिरलेच नसल्यान आदिवासी लोकांच्या जमीन संदर्भातला प्रश्न असो वा इतर गोष्टी बारणे त्याला अभिनंदन असल्याची टीका त्यांच्यावर होतेय.

दुसरीकडे बारणे यांनी मात्र कधी नव्हते ते मतदारसंघात प्रचंड कामे झाल्याचा दावा केलाय. आदिवासी भाग असेल, मावळ असेल किंवा पिंपरी चिंचवड सर्वच ठिकाणी कामाचा धडाका लावल्याचा दावा त्यांनी केलाय.

श्रीरंग बारणे यांनी संसदेत सलग चार वर्षे सर्वाधिक प्रश्न विचारण्याची कामगिरी केलीय. त्यासाठी त्यांना संसदरतन पुरस्कार ही मिळालाय. पण केंद्र सरकारशी निगडीत प्रश्नावर बारणे काहीशी अपयशी ठरल्याचे समोर येतंय त्यातून ते स्वतःला कसे बरोबर ठरवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.