AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या विद्यामान खासदारास भाजपचे तिकीट, भाजपचे धक्कातंत्र

lok sabha election 2024 bjp candidate list | भाजपच्या यादीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे अशा दिग्गजांची नावे आहेत. परंतु दादरा आणि नगर हवेलीमधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या विद्यामान खासदार कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या विद्यामान खासदारास भाजपचे तिकीट, भाजपचे धक्कातंत्र
uddhav thackeray
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 14, 2024 | 8:23 AM
Share

मुंबई | 14 मार्च 2024 : भारतीय जनता पक्षाने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे आहेत. तसेच चार विद्यामान खासदारांचे तिकीट कापले आहे. एकूण 72 जणांची नावे आहेत. त्यात एक नाव शिवसेना उबाठा पक्षातील खासदाराचे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का भाजपने दिला आहे. या यादीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे अशा दिग्गजांची नावे आहेत. परंतु दादरा आणि नगर हवेलीमधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या विद्यामान खासदार कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली आहे. तसेच महाराष्ट्रातील चार विद्यामान खासदारांचे तिकीट कापले आहे. त्यात जळगावातून उन्मेष पाटील, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर पूर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचा समावेश आहे.

कोण आहेत कलाबेन डेलकर

भाजपने दुसऱ्या यादीत दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदार संघातून शिवसेना उबाठाच्या खासदार कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली आहे. डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर यांचा २०२१ मध्ये मुंबईमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने महेश गावित यांना तिकीट दिले. तर शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत कलाबेन डेलकर 51,000 मतांनी विजय झाल्या. त्या पोटनिवडणुकीत सहानभुतीच्या लाटेवर कलाबेन डेलकर यांचा विजय झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिवसेना उबाठा खासदार कलाबेन डेलकर

मोहन डेलकर यांच्या मृत्यूचे प्रकरण गाजले

दादरा आणि नगर हवेलीमधून सात वेळा खासदार असलेले 58 वर्षीय मोहन डेलकर यांचा 22 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हमधील एका हॉटेलात मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांना दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासह आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने हा मुद्दा लावून धरला होता. मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे प्रकरण तापले होते. त्यानंतर पोटनिवडणुकीत मोहन डेलकर यांची पत्नी कलाबेन डेलकर निवडणूक रिंगणात उतरल्या. त्यांचा पोटनिवडणुकीत विजय झाला.

डिसेंबर 2023 मध्ये कलाबेन डेलकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो समोर आला होता. त्यावेळी कलाबेन यांनी ही भेट शिष्टाचाराची असल्याचे म्हटले होते. परंतु त्याचवेळी त्या भाजपच्या वाटेवर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

वाचा महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची संपूर्ण यादी

  • नंदुरबार – हिना गावित
  • धुळे – सुभाष भामरे
  • जळगाव – स्मिता वाघ
  • रावेर – रक्षा खडसे
  • अकोला – अनूप धोत्रे
  • वर्धा – रामदास तडस
  • नागपूर – नितीन गडकरी
  • चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार (सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. पण पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे)
  • नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (चिखलीकर यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. पण अखेर त्यांनाच उमेदवारी मिळाली)
  • जालना – रावसाहेब दानवे
  • दिंडोरी – भारती पवार
  • भिंवडी – कपिल पाटील
  • उत्तर मुंबई – पियूष गोयल
  • मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
  • पुणे – मुरलीधर मोहोळ
  • अहमदनगर – सुजय विखे पाटील
  • बीड – पंकजा मुंडे
  • लातूर – सुधाकर श्रृंगारे
  • माढा – रणजितसिंह निंबाळकर
  • सांगली – संजय काका पाटील

Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार