लोकसभेचा अंतिम निकाल येण्यासाठी शुक्रवारचा दिवस उजाडणार

लोकसभेचा अंतिम निकाल येण्यासाठी शुक्रवारचा दिवस उजाडणार


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. पण व्हीव्हीपॅटच्या मोजणीमुळे मतमोजणीला विलंब होण्याची चिन्हं आहेत. भिवंड मतदारसंघातील माहितीनुसार 35 फेऱ्यांनंतर व्हीव्हीपॅटच्या 34 मतदान केंद्रांवरील चिठ्ठ्या मोजण्यासाठी 17 तास लागण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नियमित वेळेपक्षा अंतिम निकालासाठी पहाटे चार ते पाच वाजू शकतात. पारदर्शकतेसाठी निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट पडताळणीही ठेवली आहे.

23 मे रोजी देशभरातील 543 पैकी 542 जागांचा निकाल लागणार आहे. तामिळनाडूतील एका मतदारसंघातील निवडणूक जास्त रक्कम सापडल्यामुळे रद्द करण्यात आली होती. मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली असून सर्वांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आलंय. मतमोजणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार, निवडणूक एजंट, मोजणी एजंट उपस्थित असतील. शिवाय मतमोजणीची व्हिडीओग्राफीही होईल.

सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 1 याप्रमाणे 5 मशीनमधील स्लिपची मोजणी शेवटी करण्यात येईल. व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी अतिरिक्त पाच तास लागू शकतात. त्यामुळे अंतिम निकाल येण्यासाठी रात्री 2 वाजण्याचा अंदाज आहे. विविध ठिकाणी वेळेमध्ये बदल असेल. राजकीय पक्षांच्या तक्रारींवर त्यावेळीच निर्णय घेतला जाईल.

VIDEO :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI