Madha Lok sabha result 2019 : माढा लोकसभा मतदारसंघ निकाल

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यांनी बाजी मारली. माढा लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 63.58% टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 1.5 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळली. या मतदारसंघात भाजपाकडून रणजीतसिंह निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांच्यात […]

Madha Lok sabha result 2019 : माढा लोकसभा मतदारसंघ निकाल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यांनी बाजी मारली. माढा लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 63.58% टक्के मतदानाची नोंद झाली होती. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 1.5 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे या मतदारसंघात मतदानापासून निकालापर्यंत धाकधूक पाहायला मिळली. या मतदारसंघात भाजपाकडून रणजीतसिंह निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांच्यात प्रमुख लढत झाली. मात्र तरी ही लढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात असल्याचं पाहायला मिळालं. 2014 मध्ये मोदी लाटेत सुद्धा माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खोत यांनी कडवी झुंज दिली होती.

माढा लोकसभा मतदारसंघ

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनारणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसंजय शिंदे (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतरअ‍ॅड. विजय मोरे (VBA)पराभूत

यंदा चित्र पूर्णपणे बदललं आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे रणांगणात नाहीत. शिवाय त्यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांनी मनाने राष्ट्रवादीचं काम केलेलं नाही.

राज्यातील प्रमुख लढतीपैकी एक सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ मिळून बनलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात अत्यंत काटे की टक्कर आहे. राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे विरुद्ध भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर असा थेट सामना झाला.

माळशिरस मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे वजनदार नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील तसेच चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, पांडुरंग परिवाराचे नेते आणि भाजप पुरस्कृत विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, त्याचा मोठा फायदा निंबाळकर यांना होईल असा दावा तज्ज्ञानी यापूर्वीच केला होता.

विधानसभानिहाय 2014 आणि 2019 ची मतदानाची आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यात लढत झाली होती. मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते-पाटील 25 हजार 344 मतांनी विजयी झाले.

यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पण त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. 2009 मध्ये शरद पवार हे माढा लोकसभेतून चांगल्या मताधिक्याने निवडून आले होते. या मतदारसंघात 18,86,313 मतदार आहेत. 2014 च्या तुलनेत यंदा 23 एप्रिल झालेल्या मतदानामध्ये तब्बल दीड टक्क्याने मतदान वाढले.

आजपर्यंत वाढणर टक्का विद्यमान खासदारासाठी धोका मानला जातो. परंतु हा वाढलेला टक्का कोणसाठी फायद्याचा ठरतो आणि कोणासाठी धोक्याचा याची आकडेवारी मतदानापासून निकालापर्यंत सुरुच राहते.

यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली माघार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढाची जागा प्रतिष्ठित केली, रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश, यामुळे राष्ट्रवादीची झालेली अडचण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आणि सभेत त्यांनी काढलेला ओबीसी असल्याचा मुद्दा देशभर गाजला.

आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिलं. ही योजना लवकरच मार्गी लागणार असल्याने शेतकरी वर्ग भाजपाकडे आकर्षित होताना पहायला मिळाला.

तसेच भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 एप्रिल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धडाका लावत चार ते पाच सभा झाल्या. शेवटची सभा 21 एप्रिल रोजी कुर्डूवाडी येथे झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह युतीच्या नेत्यांच्या सभा झाल्या.

तर आघाडीच्यावतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवतीपासून ते प्रचारच्या शेवटच्या दिवसापर्यंत संजय शिंदे यांच्या प्रचाराला गती दिली. प्रमुख नेत्यांमधे अजित पवार, धनंजय मुंडे , अशोक चव्हाण, चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात झंझावाती प्रचार केला.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.