LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Picture

निरुपमांची गच्छंती, मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष

निरुपमांची मुंबई अध्यक्षपदावरुन गच्छंती, एकतर निवडणूक लढा किंवा पदावरुन पायउतार व्हा, असे निरुपमांना आदेश होते, त्यानुसार निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मिलिंद देवरा यांची नियुक्ती

25/03/2019,8:16PM
Picture

भाजपला मदत केलेल्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांचं निलंबन मागे

अहमदनगर महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान केलेल्या 18 नगरसेवकांचं मतदान मागे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती

25/03/2019,7:25PM
Picture

कर्डिलेंचे पुतणे राष्ट्रवादीत

अहमदनगर – भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले आणि देविदास कर्डीले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

25/03/2019,6:37PM
Picture

केडीएमसीतील शिवसेना नगरसेवकाला अटक

कल्याण – केडीएमसीतील शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांना अटक, उंबर्डे येथील आरटीओ विरोधातील आंदोलनाप्रकरणी तब्बल आठ महिन्यानंतर अटक, अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळ्याने कारवाई

25/03/2019,6:11PM
Picture

'प्रतीक पाटलांना आम्ही ऑफर दिली होती'

आम्ही प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्यास ऑफर दिली होती, मात्र त्यांनी नकार दिला – खासदार राजू शेट्टी

25/03/2019,5:22PM
Picture

नितीन गडकरींचा उमेदवारी अर्ज दाखल

25/03/2019,2:31PM
Picture

उर्मिला मातोडकर निवडणुकीच्या रिंगणात?

काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मातोडकरच्या नावाची चर्चा, भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात रिंगणात उतरण्याची तयारी

25/03/2019,1:10PM
Picture

निरुपम यांचं वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीत पैसे वाटा, मुंबईतील मेळाव्यात काँग्रेसचे संजय निरुपम यांचा एकनाथ गायकवाड यांना सल्ला, तर निरुपम यांच्या विधानाचा विपर्यास, एकनाथ गायकवाडांचं स्पष्टीकरण

25/03/2019,9:45AM
Picture

मुंबईतल्या जागांचा सस्पेन्स

मुंबईतल्या तीन जागांबाबत अजूनही सस्पेन्स कायम, भाजप खासदार किरीट सोमय्यांचा ईशान्य मुंबई तर, काँग्रेसचा उत्तर मुंबई आणि वायव्य मुंबईच्या जागेचा उमेदवार ठरेना

25/03/2019,9:44AM
Picture

गडकरी, अशोक चव्हाण अर्ज भरणार

विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस, नागपुरातून नितीन गडकरी, तर मराठवाड्यात नांदेडमधून अशोक चव्हाण अर्ज भरणार

25/03/2019,9:44AM
Picture

56 इंच छातीवरुन वाद

56 इंच छातीवाले कुलभूषण जाधवांना सोडवण्यात अपयशी, पवारांचा हल्लाबोल, तर देश चालवण्यासाठी 56 पक्ष नव्हे 56 इंच छाती हवी, मुख्यमंत्र्यांचा पलटवार

25/03/2019,9:44AM
Picture

काँग्रेसला धक्के

काँग्रेसला दोन मोठे धक्के, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटलांचा काँग्रेसला रामराम, तर रणजितसिंह निंबाळकर आज भाजपात प्रवेश करणार

25/03/2019,9:43AM
Picture

अशोक चव्हाणांचा दावा

अब्दुल सत्तारांसाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार, काँग्रेसचे औरंगाबादचे उमेदवार सुभाष झांबड यांची प्रतिक्रिया, तर सत्तारांनीच उमेदवारी नाकारली, अशोक चव्हाणांचा दावा

25/03/2019,9:43AM
Picture

काँग्रेसने उमेदवार बदलला

काँग्रेसनं चंद्रपुरातला उमेदवार बदलला, विनायक बागडेंऐवजी शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकरांना उमेदवारी, हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांची निवडणुकीतून माघार, भाजपकडून सुभाष वानखेडे रिंगणात

25/03/2019,9:43AM
Picture

नगरपरिषदांचा निकाल

पालघर जिल्ह्यातील एक आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन नगरपरिषदांचा आज निकाल, कोण बाजी मारणार याकडे लक्ष

25/03/2019,9:43AM
Picture

गडकरी आज अर्ज भरणार

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज नागपुरात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार

25/03/2019,7:42AM
Picture

नाना पंचबुद्धे आज अर्ज भरणार

भंडारा गोंदियातून राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री नाना पंचबुद्धे आज अर्ज भरणार आहेत. कालच त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

25/03/2019,7:41AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *