AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात शांततेत, पारदर्शक आणि सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

राज्यात शांततेत, पारदर्शकपणे आणि सुलभरीत्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली.

राज्यात शांततेत, पारदर्शक आणि सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज
| Updated on: Sep 21, 2019 | 9:34 PM
Share

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा (Maharashtra Assembly election 2019) कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे आणि सुलभरीत्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सिंह यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत राज्यातील तयारी संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे उपस्थित होते.

राज्यात एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता (Maharashtra Assembly election 2019 dates) लागू झाली आहे. निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना (Maharashtra Assembly election 2019) प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 5 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून 7 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी (Maharashtra Assembly election 2019) होईल.

8 कोटी 94 लाख मतदार

राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष मतदार, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला तर 2 हजार 593 तृतीयपंथी असे एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची (Maharashtra Assembly election 2019) नोंदणी झाली आहे. ही मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. अद्यापही ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 4 ऑक्टोबरपर्यंत (Maharashtra Assembly election 2019 dates) अर्ज करता येईल. त्यामुळे ज्यांची नावे अद्याप यादीत नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावे, असे आवाहन सिंह यांनी केले.

मतदान केंद्रात वाढ

2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. यंदा यामध्ये 5325 मतदान केंद्रांची वाढ होऊन एकूण 96 हजार 654 मतदान केंद्रे असतील. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना सोयीचे व्हावे यासाठी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पाच पेक्षा जास्त मतदान (Maharashtra Assembly election 2019) केंद्र खालच्या मजल्यावर आणण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था, व्हिल चेअर या सर्व किमान सुविधा पुरवण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी pwd app ची सुविधा देण्यात आली आहे.

इव्हिएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम)चा वापर करण्यात (Maharashtra Assembly Election 2019 Schedule) येणार आहे. त्यासाठी राज्यात 1.80 लाख बॅलेट युनिट, 1.30 लाख कंट्रोल युनिट आणि 1.35 लाख व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

मतदान टक्केवारी

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत राज्यात 50.67 टक्के तर 2014 च्या निवडणुकीत 60.32 टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचारी सज्ज

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती (Maharashtra Assembly Election 2019 Schedule) करण्यात येणार आहे. या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत असून या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांततेत, निर्भयपणे, पारदर्शीपणे निवडणुका (Maharashtra Assembly Election 2019 Schedule) पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही सिंह यांनी सांगितले.

मतदार जनजागृती

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी आवाहन, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची (ईव्हीएम) सुरक्षितता इत्यादीबद्दल मतदारांना (Maharashtra Assembly Election 2019 Schedule) माहिती देण्यात येत आहे. इव्हिएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर पूर्ण राज्यात प्रथम होणार असल्यामुळे मतदारांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशिनवर यासंबंधीची माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत 9 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला असून त्यापैकी 6.30 लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली आहे.

सी-व्हिजिल व हेल्पलाईन

निवडणुकीत सी व्हिजिल, सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास सी व्हिजिल या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आले असून तक्रार निवारणासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्यस्तरावर 24 तास ही सेवा सुरू राहणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.