आता मतदारकेंद्रात ‘महिला राज’, राज्यात 352 सखी मतदार केंद्र

खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन (Sakhi Polling Stations) केली जाणार आहेत.

आता मतदारकेंद्रात 'महिला राज', राज्यात 352 सखी मतदार केंद्र

मुंबई : खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन (Sakhi Polling Stations) केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन अशी ही मतदान केंद्रे (Sakhi Polling Stations) असतील. या मतदान केंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी या सर्व महिला (Sakhi Polling Stations) असतील.

लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा या अनुषंगाने सखी मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

महिलांकडून नियंत्रित करण्यात येणार या मतदान केंद्रांमध्ये कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. या केंद्रांमध्ये कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर करु नये, असे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तसेच या केंद्रात तैनात असलेल्या महिला त्यांच्या आवडीचा कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. विशेष म्हणजे हे केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह स्वच्छतेवरही भर देण्यात येईल.

अशी केंद्रे निवडताना सुरक्षिततेवर विशेष लक्ष पुरवण्यात येईल. संवेदनशील ठिकाणे टाळून तहसील कार्यालय, पोलीस ठाण्याजवळ ही केंद्र उभारण्यात येतील. ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील अशा केंद्रांची, सखी मतदान केंद्रांकरिता विशेष निवड करण्यात आली आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI