LIVE: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, आज तारखा जाहीर होणार?

निवडणूक आयोग (Election Commission) आज (20 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2019) घोषणा होण्याची शक्यता आहे.

LIVE: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, आज तारखा जाहीर होणार?

मुंबई: निवडणूक आयोग (Election Commission) आज (20 सप्टेंबर) दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेत आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2019) घोषणा होण्याची शक्यता आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा (Sunil Arora) यांनी याआधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला होता. त्या बैठकीनंतर त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दिवाळीच्या अगोदरच घेण्याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचंही बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाला असून राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य मतदारांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होईल, असाही अंदाज वर्तवला जात आहे. आगामी काळात महाराष्ट्रासह एकूण 3 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा एकाचवेळी जाहीर होतील. तर झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, असा अंदाज आहे.

राज्यात 22 ऑक्टोबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं असल्याचं निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 31 दिवस आवश्यक असल्याने सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होईल. त्यासोबतच राज्यभरात आचारसंहिता लागू होईल. दिवाळी 25 ऑक्टोबरला असल्यामुळे त्यापूर्वीच मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याकडे निवडणूक आयोगाचा कल असेल. मंत्रिमंडळ अस्तित्वात येण्यासाठी मात्र दिवाळीनंतरचा मुहूर्त लागेल.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना-भाजप युतीमध्ये लढणार असल्याचं सांगत असले तरी अंतिम निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून, दोन्ही पक्ष 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहेत.

2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल

 • भाजप – 122
 • शिवसेना – 63
 • काँग्रेस – 42
 • राष्ट्रवादी – 41
 • बविआ – 03
 • शेकाप – 03
 • एमआयएम – 02
 • वंचित/भारिप – 01
 • माकप – 01
 • मनसे – 01
 • रासप – 01
 • सपा – 01
 • अपक्ष – 07
 • एकूण – 288

2014 मध्ये विभागनिहाय कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?

पश्चिम महाराष्ट्र (70) – भाजप 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी 19, इतर 04

विदर्भ (62) – भाजप 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी 01, इतर 03

मराठवाडा (46) – भाजप 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी 08, इतर 03

कोकण (39) – भाजप 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी 08, इतर 06

मुंबई (36) – भाजप 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी 00, इतर 02

उत्तर महाराष्ट्र (35) – भाजप 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी 05, इतर 02

एकूण (288) – भाजप 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी 41, इतर 20

2014 ची निवडणूक

2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा सप्टेंबर महिन्यातच आचारसंहिता लागू झाली होती. 12  सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागली होती आणि 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडली होती.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ

Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी (2014 नुसार) 

NCP MLA List 2014 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादी (2014)  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *