AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी | मंत्रिमंडळ विस्तार कधी? शिंदे गटाच्या आमदाराने दिली महत्त्वाची माहिती!

येत्या 10 ते 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तारासाठीची प्रतीक्षा संपणार, हे निश्चित दिसतंय.

मोठी बातमी | मंत्रिमंडळ विस्तार कधी? शिंदे गटाच्या आमदाराने दिली महत्त्वाची माहिती!
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 22, 2022 | 9:39 AM
Share

मुंबईः राज्याला बहुप्रतिक्षीत अशा मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) कधी होईल, याचं उत्तर मिळालंय. हिवाळी अधिवेशनापूर्वी (Winter Assembly session) मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी माहिती एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी दिली आहे. त्यानंतर सर्वच चर्चांना विराम मिळेल, असं वक्तव्य जैस्वाल यांनी केलंय. एकनाथ शिंदे गट तसेच भाजपातील आमदारांपैकी अनेक इच्छुक कॅबिनेटच्या विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. विशेषतः शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता वारंवार दिसून येतेय. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला स्थान मिळेल, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी महाविकास आघाडीतील नेत्यांचंही मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. कारण या विस्तारानंतर महायुतीमध्ये फूट पडणार, शिंदे गटातील अनेक अस्वस्थ आमदार पुन्हा एकदा बंडखोरी करणार, अशी वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहेत. तर काही शिवसेना नेत्यांनी 2023 मध्ये मध्यावधी निवडणुका लागणार, असाही दावा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा होण्यासही बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच विस्तार होईल, असं आशिष जैस्वाल म्हणाले आहेत.

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळालेल्या आमदारांमध्ये औरंगाबादचे संजय शिरसाट, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांची नाराजी वारंवार दिसून आली. बच्चू कडू यांनी तर मोठं शक्तिप्रदर्शन केलं. त्यामुळे शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर पडलेल्या किती आमदारांना आगामी टप्प्यात मंत्रिपद मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

येत्या 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच हिवाळी अधिवेशन नागपुरात झाली. मात्र महाविकास आघाडी सरकार याला अपवाद ठरलं. कोरोना संकटामुळे तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे अधिवेशन नागपुरात होऊ शकलं नाही. जवळपास दोन वर्षांच्या गॅपनंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे.

एकूणच, येत्या 10 ते 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तारासाठीची प्रतीक्षा संपणार, हे निश्चित दिसतंय.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान