AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या?, 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता

Maharashtra Cabinet Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या नंदनवन निवासस्थानी गेले. यावेळी रामदास कदमही उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळाच्या यादीवरून शेवटचा हात फिरवण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या?, 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या?, 15 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यताImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 08, 2022 | 2:17 PM
Share

मुंबई: तब्बल एक महिन्यानंतर अखेर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. उद्या 9 ऑगस्ट रोजी शिंदे-फडणवीस सरकारचा (maharashtra government) मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. हा संपूर्ण विस्तार असणार नाही. पण पहिल्या टप्प्यातील विस्तार असणार आहे. या पहिल्या टप्प्यात साधारण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच येत्या 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेशन (monsoon session) पार पडणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. त्यामुळे या अधिवेशनापूर्वीच म्हणजे उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर संध्याकाळीच मंत्र्यांना खाते देण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी कॅबिनेटची बैठकही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उद्या 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी एकूण 12 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात भाजपच्या 8 आणि शिंदे गटाच्या 7 आमदारांचा समावेश असणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाकडून माजी मंत्र्यांना आधी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजपकडून विधानसभेतील आमदारांना आधी संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शपथविधीच्या दिवशीच नेमकं चित्रं स्पष्ट होणार आहे.

विधानभवनाबाहेर हालचाली

दरम्यान, विधान भवनाबाहेर अचानक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच विधान भवनात जाण्यास मज्जाव केला जात आहे. एक दोन दिवसात मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याने चेकींग करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे कोर्टाच्या निकालाआधीच शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

फडणवीस शिंदेच्या भेटीला

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या नंदनवन निवासस्थानी गेले. यावेळी रामदास कदमही उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळाच्या यादीवरून शेवटचा हात फिरवण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

अधिवेशनाची तारीखही फिक्स

दरम्यान, विधीमंडळ सचिवांची आज बैठक पार पडली. यावेळी राज्याच्या पावसाळी अधिवेशनावर चर्चा झाली. तसेच तयारीचा आढावाही घेण्यात आला. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या 10 ते 17 ऑगस्टपर्यंत घेण्याचं या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, कोरोना नसतानाही अधिवेशन अवघ्या सात दिवसांचं होणार असल्याने त्याला विरोधकांकडून कडाडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रामदास कदमांचं मोठं विधान

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी येत्या दोन दिवसात मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं. मी मंत्रीपदी नसेल आणि कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसणार आहे, अशी माहितीही रामदास कदम यांनी दिली.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.