AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला, 19 जुलैला सोहळा

महाराष्ट्रात मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातही अनेक बैठका झाल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील खातेवाटप कधी होतंय, कोणतं खातं कुणाला मिळेल, याचे आडाखे बांधले जात होते. अखेर 19 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला, 19 जुलैला सोहळा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 1:51 PM
Share

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 19 जुलै रोजी शपथविधीचा हा सोहळा रंगणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपदीपदासाठीची निवडणूक होणार असून त्याच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शिंदे गटातील शिवसेना (Shinde Group Shivsena) आणि भाजपच्या सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना कधी होणार, याच्या प्रतिक्षेत अवघा महाराष्ट्र होता. महाराष्ट्रात मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेक आमदारांचे प्रयत्न सुरु आहेत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातही अनेक बैठका झाल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील खातेवाटप कधी होतंय, कोणतं खातं कुणाला मिळेल, याचे आडाखे बांधले जात होते. अखेर 19 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे-भाजपची यादी तयार?

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या तगड्या आमदार आणि मंत्र्यांसोबत मिळून भाजपने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले आहे. आता भाजपमधील प्रभावी आमदार आणि शिंदे गटातील आमदार या दोन्हींतून निवडक आमदारांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळपदी वर्णी लागेल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेकदा बैठका झाल्या आहेत. तसेच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीदरम्यानही मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतरही मंत्र्यांची नावं फायनल करण्यासाठी बराच वेळ मिळाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याकडून मंत्र्यांची लीस्ट तयार असून ती 19 तारखेला जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी 7 दिवसाचा विलंब का?

शिंदे आणि फडणवीस यांच्यातर्फे मंत्र्यांची नावं फायनल झाल्याचं बोललं जात आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारासाठी एवढा वेळ का लावला जातोय, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. तर आमदारांच्या सोयीसाठी भाजपने सात दिवसानंतरचा मुहूर्त निवडल्याचेही सांगण्यात आले आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. तत्पुर्वी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू 14 जुलै रोजी मुंबईत येणार आहेत. यावेळी त्या आमदार आणि खासदारांची भेट घेतील. त्यानंतर 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होईल. त्यासाठी राज्यभरातील आमदार मुंबईत येतील. त्यानंतर लगेच 19 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यभरातील आमदारांना दोन-दोन वेळा मुंबईत येण्याचं काम वाचवण्यासाठी शपथविधी 19 तारखेपर्यंत लांबवण्यात आल्याची चर्चा आहे.

फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.