AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एवढच होतं, तर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे द्यायचे, 11 कोटी इनाम देण्यावरुन कोणी असं म्हटलं?

Team India Prize Money : बार्बाडोसमध्ये मागच्या शनिवारी T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा काल विधान भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाला 11 कोटी रुपये इनामाची घोषणा केली. त्यावरुन आता राजकारण रंगल आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे द्यायला पाहिजे होते, अशी टीका सुरु झाली आहे.

एवढच होतं, तर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे द्यायचे, 11 कोटी इनाम देण्यावरुन कोणी असं म्हटलं?
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार पार पडला. चौघांनाही प्रत्येकी १ कोटी रूपये बक्षीस देण्यात आलं.
| Updated on: Jul 06, 2024 | 12:10 PM
Share

T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा काल महाराष्ट्र विधान भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी 11 कोटी रुपये इनामी रक्कमेची घोषणा केली. यावरुन आता राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना 11 कोटी रुपये देण्याची गरज नव्हती असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे. “टीम इंडियाला आता 11 कोटी रुपये देण्याची गरज होती का?. खेळाडू देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये बीसीसीआयने दिल आहेत. एवढी मोठी रक्कम इनाम म्हणून दिल्यावर स्वत:च्या तिजोरीतून पैसे द्यायची काय गरज होती?” असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला.

“क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा आहे. आयपीएल वैगेर हे पैशासाठीच आहे. त्यातून बराच पैसा मिळतो. क्रिकेटपटुंचा आदर केला पाहिजे, यात काही शंका नाही. पण एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्याची काय गरज होती? एवढच होतं, तर मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या खिशातून द्यायच होतं” अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही दोन वर्षांपूर्वी काढलेली विकेटही कोणी नाही विसरणार

काल विधान भवनात टीम इंडियातील मुंबईच्या खेळाडूंचा सत्कार करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली. “राजकारण क्रिकेटसारख आहे, कधी कोण कोणाची विकेट घेईल सांगता येत नाही. सूर्यकुमारजी तुमचा कॅच कधीच कोणी विसरणार नाही, तसच आमच्या 50 जणांच्या टीमने दोन वर्षांपूर्वी काढलेली विकेटही कधी कोणी विसरणार नाही” असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच हॉलमध्ये एकच हंशा पिकला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.