राष्ट्रवादीची पुन्हा एकदा भाजपला साथ, काँग्रेस पेचात

राष्ट्रवादीची पुन्हा एकदा भाजपला साथ, काँग्रेस पेचात

मुंबई : अहमदनगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. एकीकडे भाजपविरोधी मोट बांधण्याचे काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे ही युती झाली. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचं वातावरण आहे. स्थानिक युती असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याचा परिणाम आघाडीच्या चर्चेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपला मदत केली […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : अहमदनगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. एकीकडे भाजपविरोधी मोट बांधण्याचे काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे ही युती झाली. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजीचं वातावरण आहे. स्थानिक युती असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याचा परिणाम आघाडीच्या चर्चेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगर महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपला मदत केली खरी पण ती राज्याच्या नेतृत्वाला चांगलीच अडचणीत आणणारी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गटाला भाजपने सत्तेच्या सावलीत खेचताना त्यांच्यावर असलेल्या गंभीर फौजदारी गुन्ह्यांना बगल दिली. पण या बेरजेच्या राजकारणाने राष्ट्रवादीचे बडे नेते हवालदिल झालेत. या युतीमुळे आघाडीतल्या कुरघोडीला पुन्हा बळ मिळण्याची शक्यता आहे. वाचाराज्याचं गणित बिघडवणाऱ्या अहमदनगर महापौर निवडणुकीतील 18 मुद्दे

नगरमध्ये सर्वात मोठा पक्ष शिवसेना होता. पण भाजपला ऐनवेळी राष्ट्रवादीची साथ मिळाली. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे अदृश्य हातांची चर्चा पुन्हा सुरु झाली. यापूर्वीही राष्ट्रवादीने भाजपला वेगवेगळ्या प्रसंगात मदत केल्याचं पाहायला मिळालंय. वाचाअहमदनगरमध्ये सासऱ्याची जावयाशी युती, तिसऱ्या नंबरवरील भाजपचा महापौर

राष्ट्रवादीने भाजपला विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा दिला होता. राफेलचा वाद असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेप न घेणारं विधान केलं होतं. मोदी आणि भाजपचे नेते कायम पवारांचं कौतुक करत आलेत. त्यामुळे विश्वास राष्ट्रवादीवर तरी कसा ठेवणार असा प्रश्न काँग्रेसला पडलाय. वाचानगर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा : संग्राम जगताप

काँग्रेस एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणताना दिसतंय. कधी नव्हे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते समजूतदारपणे आघाडीची चर्चा करत भाजपला आव्हान द्यायचा प्रयत्न करत आहेत. पण राष्ट्रवादीच्या अचानक घेतल्या जाणाऱ्या भूमिकेमुळे आघाडीला खिळ बसल्याशिवाय राहत नाही.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें