Deglur By Election : देगलूरला नवा आमदार मिळणार का? यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काय घडलं?

देगलूर विधानसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पूनर्रचना झाल्यानंतर झाली. देगलूरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर दोनवेळा विजयी झाले तर सुभाष साबणे शिवसेनेकडून एकदा विजयी झाले.

Deglur By Election : देगलूरला नवा आमदार मिळणार का? यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काय घडलं?
देगलूर बिलोली पोटनिवडणुकीत तिरंगी लढत
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 6:20 PM

नांदेड: काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळं निधन झाल्यानंतर विधानसभेची पोटनिवडणूक लागली. काँग्रेसनं रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना उमदेवारी दिलीय. तर, भाजपनं शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडीनं देगलूरमध्ये चांगला जनसंपर्क असलेल्या डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी देत निवडणुकीत रंगत आणली. देगलूर विधानसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पूनर्रचना झाल्यानंतर झाली. देगलूरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर दोनवेळा विजयी झाले तर सुभाष साबणे शिवसेनेकडून एकदा विजयी झाले.

पहिल्या निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर यांचा विजय

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पूनर्रचना झाल्यानंतर देगलूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जागेसाठी राखीव झाला. 2009 च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अतापूरकर यांनी शिवसेनेचे सुभाष साबणे यांना पराभूत केलं. रावसाहेब अंतापूरकर यांना त्या निवडणुकीत 64 हजार 409 मतं मिळाली तर शिवसेनेच्या सुभाष साबणे यांना 58 हजार 398 मतं मिळाली.

2014 ला सुभाष साबणेंकडून पराभवाची परतफेड

राज्यातील सर्व पक्ष 2014 ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढले होते. यानिवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी 2009 ला झालेल्या पराभवाची परतफेड केली. सुभाष साबणे यांनी रावसाहेब अंतापूरकर यांना पराभूत केलं. सुभाष साबणे यांना 66,582 तर काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांना 58,204 मतं मिळाली. चारही पक्ष वेगळे लढल्यानं मतविभाजन झालं याचा फायदा देखील सुभाष साबणे यांना झाला.

रावसाहेब अंतापूरकर यांचं 2019 ला कमबॅक

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात शिवसेना आणि भाजपनं युती म्हणून 2019 ची निवडणूक लढवली. रावसाहेब अंतापूरकर यांनी 2019 ला मागील निवडणुकीतील पराभवाचा बदला घेत सुभाष साबणेंना पराभूत केलं. रावसाहेब अंतापूरकर यांना 89,407 मतं मिळाली तर सुभाष साबणे यांना 66,974 मतं मिळाली. रावसाहेब अंतापूरकर यांनी एक प्रकारे भाजप शिवसेनेची लाट असताना कमबॅक केलं होतं.

देगलूरला नवा आमदार मिळणार?

रावसाहेब अंतापूरकर यांचं 9 एप्रिल 2021 रोजी कोरोना विषाणू संसर्गामुळं निधन झालं होतं. देगलूर विधानसभा मतदारसंघाचं आतापर्यंत रावसाहेब अंतापूरकर आणि सुभाष साबणे यांनी नेतृत्त्व केलं आहे. सुभाष साबणे भाजपकडून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसनं जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिलीय. वंचित बहुजन आघाडीनं डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिलीय. जितेश अंतापूरकर किंवा उत्तम इंगोले विजयी झाल्यास देगलूरला नवा आमदार मिळू शकतो.

वंचितचा परिणाम जाणवणार?

देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस-भाजप या दोन पक्षांत प्रमुख लढत होत असल्याचं चित्र सुरुवातील दिसून आलं. मात्र, वंचित बुहजन आघाडीकडून डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी देण्यात आली. इंगोले यांचा मतदारसंघातील जनसंपर्क आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या सभेमुळे वंचित आघाडीदेखील स्पर्धेत आली आहे. वंचित बहुजन आघाडीनं प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चांगलीच ताकद लावली होती.वंचित बहुजन आघाडीच्या झंझावाती प्रचाराचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून येईल, असं मतं स्थानिक पत्रकार गौतम बनसोडे यांनी व्यक्त केलंय.

इतर बातम्या:

Deglur by-Election : ‘धनसंपदा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशा लढाईत भाजपचा विजय निश्चित’, सुभाष साबणेंचा दावा

Maharashtra By-Election Results 2021 Date: देगलूरचा आमदार कोण? मतदारांचा कौल काँग्रेस की भाजपला, उद्या मतमोजणी

Maharashtra Deglur Biloli by election result Jitesh Antapurkar Subhash Sabane And Uttam Ingole major contestant will new MLA choose by Deglur people

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.