AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 : आण्णा हजारे, पोपटराव, विखे, थोरात, रोहित पवार, राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 : आण्णा हजारे, पोपटराव, विखे, थोरात, रोहित पवार, राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jan 18, 2021 | 8:45 AM
Share

अहमदनगर :  जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पण, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप नेते राम शिंदे, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.(Prestige election for many veterans in Ahmednagar district)

राळेगणसिद्धी, हिवरेबाजारमध्ये 30 वर्षांनी निवडणूक

आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली आहे. अण्णा आणि पवारांना बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यात अपयश आल्याने या दोघांच्याही वर्चस्वासाठी यंदा मोठा धक्का बसलाय.

हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यामुळे 7 सदस्यीय ग्रामपंचायत 1989 पासून बिनविरोध राहिली. पण यंदा ही परंपरा खंडीत झाली असूनस सातही जागांसाठी निवडणूक झाली. दुसरीकडे राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आमदार निलेश लंके यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यांच्या या मोहिमेला यशही आले होते. गावकऱ्यांची बैठक घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी माशी शिंकली असून अण्णा आणि लंके यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.

रोहित पवार, राम शिंदेंमध्ये वर्चस्वाची लढाई

कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांचा पराभव करुन त्यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का दिला होता. त्यानंतर लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करण्यसाठी राम शिंदे प्रयत्नशिल आहेत. त्यामुळे रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.

विखे-पाटील आणि थोरातांमध्ये 12 गावात संघर्ष

राधाकृष्ट विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात संगमनेरमधील 14 ग्रामपंचायतींमध्ये सघर्ष पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील 14 गावं विखे पाटलांच्या शि्रडी मतदारसंघात येत असल्यानं या ग्रामपंचायतींमध्ये विखे समर्थक आणि थोरात समर्थकांमध्ये ग्रामपंचायतीचा आखाडा रंगला होता.

विखे-थोरात आमनेसामने लढत

चिंचपुर बुद्रुक, खळी, दाढ खुर्द, ओझर खुर्द, कनोली, चनेगाव, झरेकाठी, शेडगाव, प्रतापपूर, मनोली, प्रिंपीलौकी, आजमपुर, औरंगपुर, शिबलापुर, या 14 गावांमध्ये थेट विखे-थोरात लढत झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी आज कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या :

Prestige election for many veterans in Ahmednagar district

Follow Us
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?