Chagan Bhujbal | अधिवेशनात गाजली दाढी! शिंदेंची काळी, माझी पांढरी… देशात प्रभावी, छगन भुजबळांची तुफ्फान फटकेबाजी

छगन भुजबळ यांच्या फटकेबाजीनंतर देवेंद्र फडणवीसांनीही दाढीवरून भुजबळांना सुनावलं. ते म्हणाले, तुम्ही ज्येष्ठ आहात. प्रत्येक गोष्टीची माफी आहे. पांढऱ्या दाढीचा आमच्याकडे फार सन्मान आहे...

Chagan Bhujbal | अधिवेशनात गाजली दाढी! शिंदेंची काळी, माझी पांढरी... देशात प्रभावी,  छगन भुजबळांची तुफ्फान फटकेबाजी
पावसाळी अधिवेशनात छगन भुजबळांची दाढीवरून फटकेबाजीImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 1:54 PM

मुंबईः विधानसभेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी तुफ्फान टोलेबाजी केली. महाराष्ट्र राज्याला पहिल्यांदाच दाढीवाला मुख्यमंत्री मिळालाय. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची दाढी काळी आहे तर माझी दाढी पांढरी आहे, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला. जीएसटीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात मुद्दे उपस्थित केले. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही केंद्र सरकारला विनंती करून अत्यंत निकडीच्या वस्तुंवर लावलेला जीएसटी कमी करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) काल 17 ऑगस्टपासून सुरु झाले आहे. येत्या 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरु राहिल. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी छगन भुजबळांची टोलेबाजी चांगलीच गाजली.

पांढऱ्या दाढीचा देशात प्रभाव….

विधानसभेत आज बोलताना छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून टोलेबाजी केली. ते म्हणाले, मला तर आपल्याकडे पाहून खूप आनंद वेगळाच आहे. तुम्ही मुख्यमंत्री झालात. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिले मुख्यमंत्री दाढीवाले झालेत. त्याच्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे.. पांढऱ्या दाढीचा प्रभाव हिंदुस्थानभर आहे. दिल्लीपासून… असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं…

हे सुद्धा वाचा

तुम्हालाही स्कोप….

छगन भुजबळ एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून विधानसभेत बोलत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मध्येच एक टोला हाणला. महाराष्ट्रात दाढीवाले मुख्यमंत्री झाल्याचा मला आनंद आहे… इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं… असं भुजबळ म्हणताच देवेंद्र फडणवीस म्हणाले… तुम्हालाही स्कोप आहे.

जीएसटीवरून मुख्यमंत्र्यांना विनंती

केंद्र सरकारने अनेक दैनंदिन वस्तुंवर जीएसटी लावलाय. त्यामुळे महागाई प्रचंड वाढल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. यावेळीही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना उद्देशून वक्तव्य केलं. शाळेची पेन्सिल रबरही महागलं.. तुम्ही दोघे अतिशय कार्यक्षम आहात. दोघांचा दरारा खूप आहे.उपमुख्यमंत्र्यांचा दरारा खूप वाढलाय. त्यांनी हे सांगितलं पाहिजे, जीएसटी लावता, याचा फार वाईट परिणाम सर्वसामान्यांवर होतो. स्कूल चले हम जीएसटी के साथ… अशा घोषणाही लोकं द्यायला लागलेत.

फडणवीसांचाही टोला…

छगन भुजबळ यांच्या फटकेबाजीनंतर देवेंद्र फडणवीसांनीही दाढीवरून भुजबळांना सुनावलं. ते म्हणाले, तुम्ही ज्येष्ठ आहात. प्रत्येक गोष्टीची माफी आहे. पांढऱ्या दाढीचा आमच्याकडे फार सन्मान आहे…

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.