दसरा-दिवाळीच्या तोंडावर लोडशेडिंगची चिन्हं, ऊर्जामंत्री म्हणतात, ‘ती वेळ…’

"दसरा दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यावर वीज निर्मितीचं संकट असलं तरी लोडशेडिंगची वेळ येऊ देणार नाही", असा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलाय. ते अहमदनगर येथे बोलत होते.

दसरा-दिवाळीच्या तोंडावर लोडशेडिंगची चिन्हं, ऊर्जामंत्री म्हणतात, 'ती वेळ...'
प्राजक्त तनपुरे

मुंबई : “दसरा दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यावर वीज निर्मितीचं संकट असलं तरी लोडशेडिंगची वेळ येऊ देणार नाही”, असा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलाय. ते अहमदनगर येथे बोलत होते.

निर्धास्त रहा, ती वेळ येऊ देणार नाही!

तसेच ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारच्या कोळशाच्या खाणीतील मजदूरांचा संप तसेच पाऊस आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले भाव त्यामुळे कोळशाची कमतरता असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र ग्राहकांवर आम्ही कोणताही परिणाम होऊ देणार नाही. वीज निर्मितीसंबंधी कामे आम्ही डोळ्यात तेल घालून करु , अशी ग्वाहीही त्यांनी दिलीय.

लोडशेडिंगच्या संकटापासून वाचवण्याचे आमचे प्रामाणिक प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. वीज निर्मिती कंपन्यांकडून चढ्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवली जात आहे. आगामी काही दिवसातच सर्व सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

वीजनिर्मीतीचं संकट का?

चीन आणि लेबनॉनला गेल्या काही दिवासांमध्ये विजेच्या संकटाला तोंड द्यावं लागलं होतं. दिल्ली आणि पंजाब, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट गडद झाले आहे. देशाच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे कोळशाची वाहतूक प्रभावित झाली आहे. आयात केलेल्या कोळशाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्याने आयात केलेल्या कोळशावर आधारित वीजनिर्मिती केंद्रे त्यांच्या क्षमतेच्या निम्म्याहून कमी उत्पादन करत आहेत. या दोन कारणांमुळे वीजनिर्मिती क्षेत्र दुहेरी संकटात सापडला आहे.

अतिवृष्टीमुळं कोळशाचं उत्पादन प्रभावित

देशात कोळशाचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी, अतिवृष्टीमुळे कोळशाच्या खाणींपासून वीजनिर्मिती युनिटपर्यंत इंधनाच्या वाहतुकीवर लक्षणीय परिणाम झाला आहे. गुजरात, पंजाब, राजस्थान, दिल्ली आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. कोळशाच्या संकटामुळे पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, झारखंड, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्येही वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रातील परळी येथील वीज निर्मिती केंद्रावर देखील प्रभाव पडला आहे.

भारत गंभीर वीज संकटाला तोंड देतोय?

देशभरातील प्रमुख कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्रांमधील संयत्र निम्म्याहून कमी क्षमतेनं उर्जानिर्मिती करत आहेत. यामुळे दिल्लीप्रमाणेच, महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांनाही येत्या काही महिन्यांत विजेची कमतरता भासू शकते. सरासरी, बहुतेक वीज केंद्रांमध्ये फक्त 3 ते 4 दिवसांचा कोळसा आहे. हे सरकारी मार्गदर्शक सूचनांप्रमाणं कमी साठा आहे. नियमानुसार किमान 2 आठवड्यांचा कोळसा साठा शिल्लक असावा लागतो. भारताच्या वीजनिर्मितीमध्ये कोळशाचा वाटा 70 टक्क्यांहून अधिक आहे.

(Energy Minister prajakt tanpure Statement maharashtra Face power Crunch due to Coal Supplly)

हे ही वाचा :

आधी चीन, नंतर लेबनॉन, आणि आता देश-महाराष्ट्र अंधारात बुडणार? विजेचं संकट कसं काय? वाचा सविस्तर

राज्यावर भारनियमनाचं संकट…..?? महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वीज प्रकल्पातून 10 टक्के वीज निर्मिती

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI