AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra MLC Election 2021 : सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा? कोल्हापूरमधील हाय व्होल्टेज लढत बिनविरोध?

राज्यातील विधानपरिषदेची बिनविरोध करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून कोल्हापूरच्या जागेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Maharashtra MLC Election 2021 : सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा? कोल्हापूरमधील हाय व्होल्टेज लढत बिनविरोध?
सतेज पाटील, अमल महाडिक
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 1:37 PM
Share

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर (Kolhapur) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलेलं. गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि त्यांचे पारंपारिक विरोधक अमल महाडिक ( Amal Mahadik) यांच्यात ही लढत होणार होती. मात्र, राज्यातील विधानपरिषदेची बिनविरोध करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून कोल्हापूरच्या जागेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार अमल महाडीक उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. अर्ज माघारीसाठी थेट दिल्ली वरून महाडिक कुटुंबीयांना फोन आल्याची सुत्रांची माहिती आहे.

महाडिक कुटुंबाची बैठक सुरु

विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात कोणता निर्णय घ्यायचा यासंदर्भात महाडिक कुटुंबियांमध्ये महत्त्वाची बैठक सुरु आहे. महाडिक कुटुंबीय काय निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

मतांची आकडेवारी काय सांगते?

विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 421 मतदार आहेत. यातील पाच जण मयत असल्याने 416 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. भाजपकडे सध्या कोरे आणि आवाडे गटाला एकत्र करत 160 मत आहेत. तर, महाविकास आघाडी कडे जवळपास 250 मत आहेत. म्हणजेच विजयासाठी भाजपला आणखी 50 ते 60 मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे.

नाना पटोले यांचेही बिनविरोधचे संकेत

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याबाबत प्रस्ताव आलाय. त्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. तीन वाजेपर्यंत स्पष्टीकरण पुढे येईल. मुंबई, कोल्हापूर, नागपूर, धुळे नंदूरबारची जागा बिनविरोध करण्यासाठी चर्चा सुरु आहे. निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी प्रयत्न सुरु असून मार्ग निघेल, असंही नाना पटोले म्हणाले.

मुंबईतील विधानपरिषदेच्या दोन जागा देखील बिनविरोध झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांनी अर्ज मागं घेतल्यानं शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंह बिनविरोध निवडणूक आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी पाटील- महाडिक गट आमने सामने

कोल्हापूरमध्ये  सतेज पाटील-महाडिक गट आमने-सामने आले होते.विधानपरिषद अर्ज छाननीनंतर महाडिक-पाटील गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना पागंवलं आहे.

इतर बातम्या:

भाजपमध्ये संघाची घराणेशाही, तिथं संघाच्या विचाराचा माणूस वर जातो, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर

OBC RESERVATION : ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरला, आरक्षणासाठी रत्नागिरीत भव्य मोर्चा

Maharashtra MLC Election 2021 Satej Patil may be elected as unopposed BJP Party seniors phone call Amal Mahadik withdraw nomination said by soruces

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.