Municipality Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील ‘सुप्रीम’ सुनावणी पुढे ढकलली! आता कधी सुनावणी?

सुप्रीम कोर्टात आज महापालिकांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडणार होती.

Municipality Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील 'सुप्रीम' सुनावणी पुढे ढकलली! आता कधी सुनावणी?
सुप्रीम कोर्टImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 2:01 PM

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महापालिकांच्या निवडणुकांबाबत (Municipality Elections) महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडणार होती. ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 4 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडले. ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं निवडणुकांच्या तारखा आणि प्रभाग रचना करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. सरकारनं घेतलेल्या या निर्णयाविरोधात वेगवेगळ्या 13 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुप्रीम कोर्टात आज सुनाणी होऊन निकाल लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र ही सुनावणी अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. आता 4 मे रोजी या प्रश्नावर निकाल लागतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कधी होणार निवडणुका?

मुंबई, पुण्यासह कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड यांना मिळून एकूण 20 पेक्षा अधिक महापालिकांच्या निवडणुका कधी होणार, हे आज स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. मात्र अखेर पदरी निराशात पडली. महापालिकांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत लांबल्या जाणार का, याबाबत सुप्रीम कोर्टात काय निर्णय देतं, याकडे सगळ्यांचीच नजर लागलीय.

4 मे रोजीच्या निकालाकडे लक्ष

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुका लांबल्याच. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी भूमिका सर्वपक्षीयांनी घेतली आहे. त्यानंतर वॉर्डची रचना करण्याचा अधिकारही सरकारकडे देण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने झालेल्या या निर्णयानंतर आता पालिका निवडणुकांबाबत 4 मे रोजी मोठी निकाल लागतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

वॉर्डरचना आणि पुढे ढकलेल्या निवडणुका या सराकरनं घेतलेल्या निर्णयाविरोधात एकूण 13 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. त्या सगळ्यांवर सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकांच्या अनुशंगानं राज्य सरकारकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी सरकारनं सुप्रीम कोर्टाकडून वेळ मागून घेतली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टानं 25 एप्रिलपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ : जेव्हा शरद पवार म्हणतात, सगळेच माझ्यासारखे नसतात..

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.