…तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरे

राज ठाकरेंनी आझाद मैदानात भाषण केलं. यावेळी त्यांनी हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे आपल्या भाषणातून (Raj thackeray mns morcha speech) जाहीर केलं. 

...तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरे

मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात (Raj thackeray mns morcha speech) आलं आहे. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी तीन वाजता सहभागी झाले. यानंतर राज ठाकरेंनी आझाद मैदानात भाषण केलं. यावेळी त्यांनी हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे आपल्या भाषणातून (Raj thackeray mns morcha speech) जाहीर केलं.

“ज्यांनी आज देशभरात मोर्चे काढले त्यांना मी सांगतो. मोर्चाला मोर्चाने उत्तर मिळालं आहे. यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा राज ठाकरेंनी पाकिस्तानी घुसखोरांना दिला.

“काही हिंदू आहेत, किंवा इतर आपल्या राज्यातील आहे. त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यांच्याकडे कशासाठी पुरावे मागायचे. ते येथीलच आहे. मात्र, घुसखोरांची सफाई होण्यासाठी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. राज्याला सांगून उपयोग नाही. केंद्राला सांगतो माझ्या मुंबईतील पोलिसांना 48 तास द्या, ते महाराष्ट्रातील गुन्हे शून्य टक्क्यावर आणतील,” असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले

मी सांगितलं होतं मोर्चाला उत्तर मोर्चानं. आज तुम्ही त्यांना चोख उत्तर दिलं. काल कुणीतरी पसरवलं की मी 11 वाजून 55 मिनिटांनी इथं येणार आहे. मी काही ट्रेन आहे का? मोर्चा आहे, गाड्या यायला वेळ लागतो. पक्षाचं अधिवेशन झालं आणि त्यात मी जाहीर केलं होतं की देशभरात जे मोर्चे निघाले, खास करुन मुस्लिमांनी जे मोर्चे काढले याचे अर्थच मला कळाले नाही. जे जन्मापासून वर्षांनूवर्षे येथे राहिले त्यांना कोण काढून देणार होतं? तसं कायद्यातच नाही, मग त्यांनी ताकद कुणाला दाखवली? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

“अनेकांना सीएए, एनआरसी कायदा काय आहे याची माहितीही नाही. आज जो कायदा केला आहे त्यात पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथे जर धार्मिक अल्पसंख्यांकांवर अन्याय झाला तर त्यांना भारत नागरिकत्व देईल. 1955 चा हा कायदा आहे. फाळणी झाल्यानंतर 1955 ला हा कायदा झाला. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आज 2000 मधील परिस्थिती वेगळी आहे. तो देश त्यावेळी भारतापासून वेगळा झाला होता. मात्र, आज त्या देशाची काय अवस्था आहे.”

“एकतर उजवीकडे राहा किंवा डावीकडे राहा अशी सध्या परिस्थिती आहे. केंद्राने काही वाईट केलं आणि त्यावर टीका केली तर ते भाजपविरोधात आणि केंद्राकडून काही चांगले निर्णय झाले आणि कौतुक केलं तर ते भाजपकडून असं बोलतात,” असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला

“जेव्हा भाजपने चांगले निर्णय घेतले तेव्हा त्यांचं कौतुक केलं. एकतर इकडंचं किंवा तिकडचं असं झालं आहे. सीएए फक्त चार ओळीचं आहे. प्रश्न पाकिस्तानच्या परिस्थितीचा आहे. आज पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले

“देशात अनेक बॉम्बस्फोट झाले. त्यात अनेक माणसं मारली गेली. या सर्व बॉम्बस्फोटामागे कोण होतं. आज मुंबईत 1992-93 मध्ये बॉम्बस्फोट झाले ते दाऊदने केले. त्याला पाकिस्तान सांभाळत आहे. तिकडच्या हिंदू अल्पसंख्यांकांवर अन्याय झाला तर त्यांना नागरिकत्व दिलं जात आहे. तिकडच्या मुस्लिमांना कसं घेणार? एक आंतरराष्ट्रीय करारानुसार अल्पसंख्यांकांना घ्यावं लागतं.”

“माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का यांना. कुठल्याही देशातील लोकांनी यायचं, कुठेही राहायचं. या देशात पाण्याचा, आरोग्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न आहे हेही मला माहिती आहे. मात्र, घुसखोरांचाही प्रश्न तितकाच मोठा आहे. भारताने माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. आज जगभरात घुसखोरांवर कारवाई सुरु आहे.”

“पुण्यात एका बांगलादेशी माणसाने मराठी नाव लावलं, मराठी कुटुंबातील मुलीशी लग्न केलं. नंतर कळालं तो बांगलादेशी आहे. मराठी माणसांमुळे कधीही दंगली झाल्या नाहीत कारण तो इथला आहे. मात्र, आज भारतात असे अनेक भाग आहेत. तेथे बाहेरील देशातील मुस्लिम आहेत. मुस्लिमच काय पण नायजेरियाचे लोकही आले आहेत. ते ड्रग्ज विकतात, मुलींची छेड काढतात. आम्ही फक्त षंडासारखं बघत बसायचं,” असेही राज ठाकरे म्हणाले.

“आज माझं केंद्र सरकारला हेच सांगणं आहे. जर तुम्ही देशातील आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हे कायदे आणणार असेल तर ते चुकीचं आहे. हे कायदे करणार असाल, तर त्याची कठोर अंमलबजावणी करा,”

“पोलिसांवर हात टाकायला यांची हिंमत होती. आता यांच्यावर हात टाकायला किती वेळ लागेल? त्यावेळी रझा अकादमीच्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी या ठिकाणी बांगलादेशी माणसाचा पासपोर्ट सापडला. फक्त बांगलादेशातून 2 कोटी लोक आले आहेत. इतर ठिकाणी किती आले याची माहिती नाही. आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो. आज त्यांचं मोठं षडयंत्र सुरु आहे. एक जागा आहे जिथं परदेशातील मुल्ला मौलवी येत आहेत. मी याची माहिती गृहखात्याला देणार आहे. पोलिस खात्यातूनच मला ही माहिती मिळाली आहे,” असेही राज ठाकरे (Raj thackeray mns morcha speech) म्हणाले

Raj thackeray mns morcha speech

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI