AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha election Breaking : मोठी राजकीय घडामोड! पवारांनी मतांचा कोटा बदलल्याने मुख्यमंत्र्यांचा प्रचंड संताप- सूत्र

ऐन क्षणी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलला आहे.

Rajya Sabha election Breaking : मोठी राजकीय घडामोड! पवारांनी मतांचा कोटा बदलल्याने मुख्यमंत्र्यांचा प्रचंड संताप- सूत्र
आघाडीत पुन्हा बिघाडीImage Credit source: tv9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jun 10, 2022 | 7:34 AM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha election) काही तास आधी ‘मविआ’त बिघाडी झाल्याची चर्चा आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद झाले असल्याचं राजकीय वर्तुळातील सूत्रांनी म्हटलंय. ऐन क्षणी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. 42 मतांचा कोटा शरद पवारांनी 44 केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संतापले असल्याची माहिती सूत्रींनी दिली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मतांचा कोटा बदलल्याने मुख्यमंत्र्यांचा प्रचंड संताप झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घडमोड समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या अवघे काही तास आधी कोटा बदलल्यानं शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी आहेत.

प्रफुल्ल पटेलांसाठी कोटा बदलला

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मतांचा कोटा बदललाय. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना गुरुवारी मतदानाची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर मतांचं गणित बदललं होतं. एकूण 42 मतं राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदावाराला लागणार आहेत. 42 मतांचा कोटा ठरलेला असताना, तो 44 का केला गेला, यावरुन चर्चांना उधाण आलंय.

आघाडीत बिघाडीची शक्यता

राष्ट्रवादीची मतं शिवसेनेला न मिळाल्यास महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असं मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे शिवसेनेची दुसरी जागा धोक्यात आली आहे. शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत दोन उमेदवार उभे केलेत. संजय राऊत आणि संजय पवार यांना शिवसेनेनं राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. संजय पवार यांची थेट लढत धनंजय महाडिक यांच्या सामना होणार आहे. आपला दुसरा उमेदावर निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

शिवसेना नेत्यांनी घेतली पवारांची भेट

शरद पवार यांनी मतांचा कोटा बदलल्यानं अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंतांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. मिलिंद नार्वेकरांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. प्रफुल्ल पटेल यांचा कोटा वाढवल्यानं आता सहाव्या जागेसाठीची मतांची जुळवाजुळव करताना दगाफटका होऊ शकतो, अशी शक्यता ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी वर्तवली आहे. त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

काय पडसाद उमटू शकतात

वरिष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, शरद पवारांनी जर कोटा वाढवला असेल, तर यावरुन शरद पवारांच्या राष्ट्रीय राजकारणाच्या नेतृत्त्वात पडसाद उमटतील. पण शरद पवार यांनी खरच कोटा बदलला असेल का? यावरुनही अशोक वानखेडे यांनी शंका व्यक्त केली. मात्र शरद पवारांची राजकीय कारकिर्द पाहता, कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, असंही ते म्हणाले.

Follow Us
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...