AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : काही लोक E20 वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत: हरदीप पुरी

| Edited By: | Updated on: Aug 08, 2026 | 8:58 AM
Share

Maharashtra News LIVE : फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिक्षकांची मेगा भरती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. काल रात्री पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा व्हिडिओ शेअर करत तरुणाईला मोठे आवाहन केले.

Maharashtra News LIVE : काही लोक E20 वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत: हरदीप पुरी
वाचा अपडेट्स

Maharashtra News LIVE : राज्यात शिक्षकांची मेगाभरती होणार आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षकांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीची सुरू असलेली बैठक संपली. राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पुढील महिन्यात नवीन पक्ष हा देशातील तरुणाईशी संवाद साधणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री इन्स्टावर पुन्हा एक व्हिडिओ अपलोड केला. त्यांनी स्वदेशीचा मंत्र दिला. देशवासियांना स्वदेशी वापराचे आवाहन केले. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा इन्स्टावरून तरुणाईशी संवाद साधणार आहेत.  उपमुख्तयमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत आहेत. तर  मराठा आंदोलक मनोज जरांगे हे काल राज्य सरकारवर चांगलेच संतापले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डबल गेम केल्याचा आरोप केला. तर जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला. फडणवीस यांच्यावरही त्यांनी आरोपांची राळ उडवली. आज जरांगे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सुनेने आरोप केल्याप्रकरणी आज विनायक राऊत यांच्या खटल्यात निकाल येण्याची शक्यता आहे. आज भंडारा बंदची हाक देण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ दिसू शकतो. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Aug 2026 07:54 PM (IST)

    एफसीआरए विधेयक हा भारतीय संसदेचा अंतर्गत विषय आहे: परराष्ट्र मंत्रालय

    एफसीआरए विधेयकासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “आम्ही अनेक देशांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आहेत. भारताशी संबंधित कायदेशीर बाबी या अंतर्गत बाबी आहेत.”

  • 07 Aug 2026 07:39 PM (IST)

    इराणचे सरकार उलथवून टाकण्याची योजना अयशस्वी

    वृत्तानुसार, इराणमध्ये लष्करी उठावाची योजना आखली जात होती, परंतु ही योजना फुटल्याने संपूर्ण योजना अयशस्वी ठरली. दरम्यान, इस्रायली गुप्तचर संस्था मोसादच्या इराण विभागाच्या प्रमुखांना बडतर्फ करण्यात आले आहे. मोसादने दोन अधिकाऱ्यांना हटवल्याचे वृत्त आहे.

  • 07 Aug 2026 07:30 PM (IST)

    भारताच्या परकीय चलन साठ्यात लक्षणीय वाढ

    भारताचा परकीय चलन साठा लक्षणीयरीत्या वाढून 692.86 अब्ज डॉलर झाला आहे.

  • 07 Aug 2026 07:25 PM (IST)

    काही लोक E20 वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत: हरदीप पुरी

    पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, “आमचा जैवइंधन मिश्रण कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. काही लोक E20 वरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दररोज 6 ते 7  कोटी ग्राहक पेट्रोल पंपावर येतात. भेसळ झालीच, तर ती कशातही होऊ शकते. तुमच्या अन्नात, तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेत, रॉकेल, डिझेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीत भेसळ होऊ शकते. कोणीतरी गोष्टी संदर्भाबाहेर नेण्याचा प्रयत्न करत आहे.”

  • 07 Aug 2026 07:15 PM (IST)

    E20 संदर्भात X वर राहुल गांधी यांची पोस्ट

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ई-20 पेट्रोलसंदर्भात ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणाले की, डाळीत फक्त काळं  नाही, तर संपूर्ण डाळच काळी झाली आहे.

  • 07 Aug 2026 07:07 PM (IST)

    कृष्ण जन्मभूमी मंदिराच्या रथोत्सवासंदर्भात संतांची एक मोठी सभा

    श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराच्या कार सेवेसंदर्भात वृंदावनमध्ये संतांची एक मोठी सभा झाली. धर्म रक्षा संघाचे अध्यक्ष सौरभ गौर यांच्यासह अनेक संत, ऋषी आणि महामंडलेश्वर मोहिनी शरण महाराजांच्या आश्रमात उपस्थित होते. 8 ऑगस्ट रोजी चित्रगुप्त पीठावर पूजा आणि त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी कार सेवा करण्याचे ठरले.

  • 07 Aug 2026 06:52 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

    जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पहिल्या टप्प्यातील 65 हजार 343 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्पातील एकूण शेतकऱ्यांपैकी आज एकूण KYS पूर्ण करणाऱ्या 31 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 185 कोटींच्या आसपास एवढी रक्कम आज 31 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.

  • 07 Aug 2026 06:29 PM (IST)

    रावसाहेब दानवे यांचं वय आता राज्यपाल व्हायचं झालं आहे – आमदार बबनराव लोणीकर

    भाजप नेते रावसाहेब दानवे यांचं वय आता राज्यपाल व्हायचं झालं असून त्यांनी आता राज्यपाल व्हावं, त्यासाठी आमच्या सगळ्यांचा पाठिंबा असल्याचा टोला भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी लगावला आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर भाषणात ते बोलत होते.

  • 07 Aug 2026 06:19 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचा उद्यापासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा

    धाराशिवच्या खेड गावात मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत झाले आहे. जरांगे पाटील धाराशिवच्या खेडमध्ये मराठा बांधवा बरोबर बैठक घेणार आहेत. खेड येथे ओबीसी कुणबी प्रमाणपत्रावर विविध क्षेत्रात नोकरीला लागलेल्या विद्यार्थ्यांनी जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जरांगे पाटील आज तुळजापूर येथे मुक्कामी असून उद्या तुळजाभवानीचे दर्शन घेऊन पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला निघणार आहेत.

  • 07 Aug 2026 05:54 PM (IST)

    मुंबई : मुलुंड चेकनाका येथे बेस्ट बसचा अपघात

    मुंबईतील मुलुंड चेकनाका येथे बेस्ट बसचा अपघात झाला आहे. संबंधित बस नेरुळ स्थानकावरून मुलुंड चेकनाका बस स्थानकाकडे जात असताना हा अपघात झाला आहे. ही बस मुलुंड चेकनाका येथील वाहतूक सिग्नलवर थांबली होती. त्यावेळी, एक महिला पादचारी रस्ता ओलांडत होती. सिग्नल सुटल्यावर बसची महिलेला धडक बसली, यात महिलेचा मृत्यू झाला आहे.

  • 07 Aug 2026 05:40 PM (IST)

    मुंबई : जी दक्षिण महापालिका कार्यालयावर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा

    मुंबईतील जी दक्षिण महापालिका कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोर्चा काढला आहे. विभागातील कचरा कंत्राटदार उचलत नसल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे. आमदार महेश सावंत, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, नगरसेवक निशिकांत शिंदे, अबोली खाड्ये, आशिष चेंबूरकर, हेमांगी वरळीकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

  • 07 Aug 2026 05:24 PM (IST)

    वाशिम – लष्कराच्या जवानाने पत्नीची केली हत्या

    वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील शिवनगर राहणाऱ्या भारतीय लष्कराच्या 6 व्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेल्या 28 वर्षीय ज्ञानेश्वर मदने याने आपल्या घरातच पत्नी दीपाली मदनेची हत्या केली आहे. याप्रकरणी करंजा शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवान आणि त्याच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

  • 07 Aug 2026 05:13 PM (IST)

    मोदी-शहांच्या भेटीबाबत तटकरेंचा मोठा खुलासा

    सुनील तटकरे यांनी मोदी-शहांच्या भेटीबाबत बोलताना म्हटले की, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, ही सदिच्छा आणि मार्गदर्शन अशा प्रकारची भेट होती. देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट ही सदिच्छा भेट होती. त्यानंतर प्रामुख्याने मुंबई-गोवा रस्त्याच्या संदर्भात जो प्रश्न कोकणवासियांना भेडसावत आहे त्याबाबत आणि त्या रस्त्यावर असलेला टोलनाक्यांबाबत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.’

  • 07 Aug 2026 04:32 PM (IST)

    घुले कुटुंबीयांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इमारतीवर चढून आंदोलन

    घुले कुटुंबीयांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील इमारतीवर चढून आंदोलन.

    सुषमा घुले यांच्या भावाचा आक्रमक पवित्रा.

    घुले कुटुंबीयांच्या आंदोलनाची दखल प्रशासन घेत नसल्याचा आरोप करत इमारतीवर चढून आंदोलन.

    गेल्या तीन दिवसांपासून घुले कुटुंबीयांचे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे आमरण उपोषण.

  • 07 Aug 2026 04:15 PM (IST)

    गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

    कोकण वासियांसाठी परिवहन विभागाचा महत्वाचा निर्णय

    गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

    ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५,२२० जादा बसेस सोडण्याचा निर्णय

    परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची माहिती

  • 07 Aug 2026 03:55 PM (IST)

    3 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात भंडारा बंद

    3 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात भंडारा बंद… नराधमाला फाशी द्या, स्थानिक नागरिक आक्रमक… दुकानं बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त…

  • 07 Aug 2026 03:45 PM (IST)

    सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर भेटीमुळे भाजपचे नेते नाराज

    सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर भेटीमुळे भाजपचे नेते नाराज… बिहारच्या बाकींपूरमध्ये भाजपचा पराभव केलेल्याशी चर्चा करणं अयोग्य, भाजपची नाराजी- सूत्रांची माहिती…

  • 07 Aug 2026 03:35 PM (IST)

    शिंदे आणि शिवसेना खासदारांकडून मोदींची भेट

    शिंदे आणि शिवसेना खासदारांकडून मोदींची भेट. मोदी-शिंदे यांच्यात 1 तासापेक्षा अधिक वेळ बैठक सुरु होती. मोदींकडून शिंदेंच्या वडिलांची आणि नातवाची विचारपूस. मोदींचं फुटीर खासदारांसोबत ब्रेकफास्ट

  • 07 Aug 2026 03:25 PM (IST)

    महिनाभरात कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित- मुख्यमंत्री

    मला अतिशय आंनद आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत आपण कर्जमाफीची यादी जाहीर केली. 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पहिला हप्ता आज गेला. एनपीएवर लागलेल्या व्याजामुळे कर्ज आणि कर्जमाफी यात तफावत दिसत होती. आता कर्ज, आणि शासनाने भरलेले पैसे एक त्यामुळे शेतकऱ्यांची खाती आता निल झाली आहेत. १२ लाख खाते बँकांना पुन्हा पाठवले, त्यात काही चुका. आठवडाभरात बँका त्यात सुधारणा करतील.

  • 07 Aug 2026 03:13 PM (IST)

    राज्यात 30 हजार जागांसाठी शिक्षक भरती होणार

    राज्यात 30 हजार जागांसाठी शिक्षक भरती होणार… 11 ऑगस्टपर्यंत शिक्षक भरतीसाठी अर्ज दाखल करता येणार… स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी आस्थापनात पवित्र पोर्टलद्वारे भरती…

  • 07 Aug 2026 02:56 PM (IST)

    राज ठाकरेंना कुंभमेळ्याच्या कामांची यादी देतो, त्यांचा काहीतरी गैरसमज- गिरीश महाजन

    राज ठाकरेंना कुंभमेळ्याच्या कामांची यादी देतो, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. कुंभमेळा हरित, सुंदर, स्वच्छ व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरक्षित कुंभमेळा व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री दर महिन्याला कुंभमेळ्याचा आढावा घेतील, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.

  • 07 Aug 2026 02:54 PM (IST)

    पुढील दोन-तीन दिवसांत नाशिकच्या रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवले जातील- गिरीश महाजन

    यंदाचा कुंभमेळा आगळा-वेगळा होणार आहे. नाशिकच्या खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी कडक सूचना दिल्या आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवले जातील. नाशिक शहरातील मुख्य रस्ते सिमेंटचे करणार, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.

  • 07 Aug 2026 02:52 PM (IST)

    शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित

    शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार 29 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

  • 07 Aug 2026 02:50 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ब्रेकफास्ट भेटीवर शिंदे यांची प्रतिक्रिया

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ब्रेकफास्ट भेटीवर शिंदे यांची प्रतिक्रिया “मोदींनी तरुणांना नेहमीच मोठं केले आहे. युवासोबत सरकार आहे. 20247 च्या विकसित भारतात तरुणांचे मोठे योगदान असेल.”

  • 07 Aug 2026 02:44 PM (IST)

    पुण्याकडून मुंबईकडे जाताना मिसिंग लिंकच्या टनलमध्ये अपघात

    पुण्याकडून मुंबईकडे जाताना मिसिंग लिंकच्या टनलमध्ये अपघात झाला आहे. अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे आणि एक जण जखमी झाला आहे. तर तिघे सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 07 Aug 2026 02:38 PM (IST)

    नाशिकमधील खड्ड्यांवरुन फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं

    नाशिकमधील खड्ड्यांवरुन फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. “खड्डे बुजवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्यावर दंड लावा. लोकांना कारणं सांगू नका. रिलॅक्स राहून चालणार नाही.”

  • 07 Aug 2026 02:34 PM (IST)

    Gen Z चे कंगना रणौतकडून तोंडभर कौतुक

    Gen Z चे कंगना रणौतकडून तोंडभर कौतुक म्हणाली की,”Gen Z आमची सर्वात मोठी ताकद आहे, गोंधळ घालणारे खूप कमी लोक आहेत, विरोधकांची विध्वंसक मानसिकता देशासमोर उघड झाली आहे. आम्हाला तरुण पिढीचा नेहमीच अभिमान आहे.”

  • 07 Aug 2026 02:30 PM (IST)

    मोदी यांचे फुटीर खासदारांसोबतचे फोटो समोर

    मोदी यांचे फुटीर खासदारांसोबतचे फोटो समोर आले आहेत. शिंदे आणि शिवसेनेतील खासदारांची मोदी यांनी भेट घेतली आहे. मोदी यांच्याकडून शिंदे यांच्या वडिलांची आणि नातवाची चौकशी अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • 07 Aug 2026 02:25 PM (IST)

    Gen Z बाबत भागवातांच्या विधानाचे CJP कडून स्वागत

    “आंदोलनकर्त्यांना देशविरोधी म्हणणे भाजपाने थांबवावे, विद्यार्थ्यांना देशविरोधी म्हणू नका, भागवतांनी भाजपाला सांगावे” असे अभिजीत दिपके म्हणाला आहे.

  • 07 Aug 2026 02:20 PM (IST)

    गणेश नाईक यांची नाव न घेता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका

    गणेश नाईक यांनी नाव न घेता क्लस्टर योजनेवरुन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “कोणीही कायदा करेल आणि लोकांवर लादेल हे मी सहन करणार नाही, क्लस्टर योजनेला माझा विरोध नाही पण क्लस्टर शब्दात जी मोडतोड सुरु आहे त्याला माझा विरोध आहे.”

  • 07 Aug 2026 02:15 PM (IST)

    आम्ही सरकार पाडून बदला घेणार- मनोज जरांगे

    तुम्ही प्रमाणपत्र रद्द करुन बदला घेतलात ना आता आम्ही तुमचे सरकार पाडून बदला घेणार. मनोज जरांगे यांमी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप केला आहे.

  • 07 Aug 2026 02:10 PM (IST)

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा सवाल

    ठाण्यात १०५३ एकर वन जमिनीचा प्रश्न मार्गी , महसूल मंत्र्यांचे आभार मानत १९३ एकर वन जमिनी बाबत शासन गंभीर का नाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा सवाल. १९३ एकर वन जमीन आणि १०५३ एकर वन जमीन दोन्ही प्रकरणात साम्य असून शासनाने याबाबतीत गांभीर्य दाखवणे गरजेचे असल्याचे मनोज प्रधान यांनी सांगितले. जर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जात असू तर शासन का या प्रकरणात सुप्रीम कोर्टात का जात नाही असाही उपस्थित केला सवाल.

  • 07 Aug 2026 02:04 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचा पंढरपुरातून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ

    मनोज जरांगे पाटील यांचा पंढरपुरातून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ. उद्या पंढरपुरात आगमन; रविवारी तालुक्यातील सरकोली येथे जाहीर सभेचे आयोजन. कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर जरांगे पाटील आक्रमक. पंढरपूरच्या सभेनंतर पश्चिम महाराष्ट्रात संवाद सभांची मालिका. सातारा गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी दौऱ्याची सुरुवात. या दौऱ्यात अनेक लोकप्रतिनिधी जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर असण्याची चर्चा.

  • 07 Aug 2026 01:47 PM (IST)

    जळगाव शहरातील स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था, 70 हून अधिक खड्डे

    जळगाव शहरातील स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था, अर्धा किलोमीटरचा रस्त्यावर तब्बल 70 पेक्षा जास्त खड्डे आहेत. अर्धा किलोमीटरच्या अंतरात तब्बल सहा फुटांपेक्षा जास्त लांब आणि 10 सेंटीमीटर पर्यंत खोल असे 70 पेक्षा जास्त खड्डे एकाच रस्त्यावर दिसत आहेत.

    नागरिकांना जिवंतपणी तर खड्ड्यांच्या यातना आहेतच, पण मेल्यानंतर देखील सरणावर जाताना खड्ड्यांचा त्रास होत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.  स्मशानभूमीचे वाहन जाताना खड्ड्यांमुळे मृतदेह वाहनातून खाली पडल्याची भीती असते, असंही काही नागरिकांनी सांगितलं.

  • 07 Aug 2026 01:39 PM (IST)

    वनमंत्री गणेश नाईक यांची पुन्हा एकनाथ शिंदेंवर टीका

    वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर क्लस्टर वरून टीका केली आहे.  कोणी तर कुठे ना कुठे असे धागे जोडून आपल्या मर्जीप्रमाणे कायदा निर्माण करेल, आणि तो लोकांवर लादेल. पण हा गणेश नाईक सहन करणार नाही, असं त्यांनी सुनावलं .

  • 07 Aug 2026 01:38 PM (IST)

    प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीमध्ये नेमणूक ? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

    प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यात वेगवेगळ्या पक्षाचा प्रचार केला आहे.  त्यांनी सल्ला देण्याचं काम केलं आहे. राष्ट्रवादीमध्ये त्यांची नेमणूक झाली आहे असं मला वाटत नाही, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले.

  • 07 Aug 2026 01:21 PM (IST)

    हाती चले बाजार कुत्ते भोके हजार – प्रसाद लाड यांचं लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर

    प्रसाद लाड कोण आहे अजून त्यांना माहिती नाही.  त्यांनी आधी गुगल सर्च करावं.   हाती चले बाजार कुत्ते भोके हजार,  अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही, असं म्हणत प्रसाद लाड यांनी लक्ष्मण हाकेंना चोख प्रत्युत्तर दिलं.  असे अनेक आले आणि अनेक गेले, याच्यामागे चार लोक नाहीत.  अशा लोकांवर न बोललेले चांगलं, असंही ते म्हणाले.

  • 07 Aug 2026 01:07 PM (IST)

    नाशिक – MIM नगरसेवक मतीन पटेलला 11ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

    नाशिक – MIM नगरसेवक मतीन पटेलला 11 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.  TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलवर आरोप आहेत.  नाशिक रोड न्यायालयाने अजामीनपात्र (NBW) मतीन पटेल विरोधात वॉरंट जारी केलं होतं.  नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरहून मतीन पटेलला काल मध्यरात्री ताब्यात घेतलं होतं.

  • 07 Aug 2026 12:52 PM (IST)

    जळगावात मनसेच्या वतीने कचरा फेको आंदोलन

    जळगावच्या भुसावळ नगरपालिकेच्या आवारात आज मनसेने कचरा फेको आंदोलन केलं. मनसेने शहरातील नालेसफाई आणि स्वच्छतेच्या प्रलंबित प्रश्नांवरून कचरा फेक आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मनसे शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.आंदोलनानंतर चावरे यांना निवेदन देण्यात आले.

  • 07 Aug 2026 12:44 PM (IST)

    अभिजीत दिपके पोलिस अधिकाऱ्यांवर संतापले

    अभिजीत दिपके पोलिस अधिकाऱ्यांवर संतापले. दीपके यांच्या भेटीसाठी त्यांच्या राहत्या घरी अनेक जण आले होते. त्यावेळी पोलीस अधिकारीही घराच्या आवारात शिरले. त्यामुळे अभिजीत दीपके हे पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 07 Aug 2026 12:39 PM (IST)

    पंढरपूरच्या वाघोलीत बिबट्याचे दर्शन, नागरिक भयभीत

    पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील वाघोली गावात बिबट्याचे दर्शन‌ झालं आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. काही स्थानिक शेतकऱ्यांनी काल संध्याकाळी बिबट्या ऊसाच्या शेतात लपल्याचा पाहिला. त्यानंतर त्यांची माहिती त्यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी कॅमेरे आणि सापळे लावण्यात आले आहेत.

  • 07 Aug 2026 12:23 PM (IST)

    मुंबईच्या महापौरांना धमकीचा ईमेल; बॉम्बशोधक पथक पालिकेत

    मुंबईच्या महापौरांना धमकीचा ईमेल आला आहे. त्यानंतर बॉम्बशोधक पथक मुंबईत पालिकेत पोहोचलं आहे. या धमकीनंतर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा पालिकेबाहेर तैनात करण्यात आला आहे.

  • 07 Aug 2026 12:20 PM (IST)

    एकनाथ शिंदे संसद भवनात, पंतप्रधान मोदींच्या भेटीला

    एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे संसदेत पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. शिंदेंच्या फुटीर खासदारांनीही आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

  • 07 Aug 2026 12:09 PM (IST)

    मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर

    डॉक्टरांना मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाने रमेश म्हात्रे यांच्यासह या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर केलाय. जामीनाच्या अटींनुसार रमेश म्हात्रे यांनी पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्राबाहेर राहावे, असं कोर्टाने म्हटलं आहे.

  • 07 Aug 2026 11:57 AM (IST)

    इंदापूर मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पुतळ्यांची राष्ट्रवादीकडून काढली प्रेत यात्रा

    उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्‍या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्‍याबाबत काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्‍या आक्षेपार्ह वक्‍तव्‍याच्‍या निषेधार्थ इंदापूर तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्‍या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ॲम्बुलन्समधून प्रतिकारत्मक प्रेत आणून यात्रा काढण्यात आली. या प्रेत यात्रेमध्ये हर्षवर्धन सपकाळ हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. सदरची प्रेत यात्रा इंदापूर तहसील कार्यालयापर्यंत काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध नोंदविण्यात आला.

  • 07 Aug 2026 11:50 AM (IST)

    भाजप नेते विजय चौधरी यांना आज दुपारी २ वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार

    भाजप नेते विजय चौधरी यांना आज दुपारी २ वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह व अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप आहे.  या प्रकरणी डॉ. हिना गावित यांच्या भावाच्या फिर्यादीवरून ॲट्रॉसिटी आणि विनयभंगासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विजय चौधरी यांना नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. डॉ. हिना गावित यांच्या भावाने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विजय चौधरी यांच्याविरुद्ध तीन ॲट्रॉसिटीचे आणि एक विनयभंगाचा असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. न्यायालय त्यांना पोलीस कोठडी देते की न्यायालयीन कोठडी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 07 Aug 2026 11:40 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर येथे सहावीतील विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग

    -छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर येथे सहावीतील विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी शाळेतील शिपाई अटकेत असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. चॉकलेटचे आमिष दाखवून विद्यार्थिनीला एकांतात नेल्याचा आरोप आहे, पाच ते सहा वेळा अयोग्य स्पर्श केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला.   न्यायालयाकडून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • 07 Aug 2026 11:34 AM (IST)

    मोदी आणि शिंदेंमध्ये होणाऱ्या बैठकीवरुन राऊतांती टीका

    पंतप्रधानांनी संविधानाचा सन्मान केला पाहिजे. शिंदे आणि 40 आमदार अंड्यातून आले नाहीत, ते ठाकरेंचे आमदार आहे.. किती फोडलेस आणि अजून किती फोडणार यावर चर्चा होणारच. मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते हस्तक म्हणून काम करतात… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 07 Aug 2026 11:29 AM (IST)

    गरीब मराठा समाजाचं वाटोळ करत आहेत – मनोज जरांगे

    कुणबी नोंदी कमी करण्याचा सरकारचा कट असून गरीब मराठा समाजाचं वाटोळ करत आहेत… गरीब मराठ्यांच्या लेकरा – बाळांसाठी मी लढतोय… असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं…

  • 07 Aug 2026 11:20 AM (IST)

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला अमित ठाकरेंची उपस्थिती

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला अमित ठाकरेंची उपस्थित राहिले आहेत. महर्षी दयानंद महाविद्याबाहेरील सदस्य नोंदणीला अमित ठाकरे उपस्थित आहेत. कॉलेज कॅम्पसमध्ये अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. अमित ठाकरे विविध महाविद्यालयांना भेट देणार आहेत. मनविसेचा सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे.

  • 07 Aug 2026 11:08 AM (IST)

    खडकवासला धरणातून मुठा नदीत 3 हजार 800 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

    खडकवासला धरणातून मुठा नदीत 3 हजार 800 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे भरली आहेत. घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण कमी झाल्याने खडकवासला धरणातून कमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.  पावसाच्या प्रमाणानुसार खडकवासलातून कमी जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात येईल अशी माहिती धरण प्रशासनाची दिली आहे.

  • 07 Aug 2026 10:50 AM (IST)

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला अमित ठाकरेंची उपस्थिती

    महर्षी दयानंद महाविद्याबाहेरील सदस्य नोंदणीला अमित ठाकरे उपस्थित. कॉलेज कॅम्पसमध्ये अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी साधणार थेट संवाद. अमित ठाकरे विविध महाविद्यालयांना भेट देणार. मनविसेचा सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात

  • 07 Aug 2026 10:40 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर येथे सहावीतील विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग

    शाळेतील शिपाई अटकेत; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. चॉकलेटचे आमिष दाखवून विद्यार्थिनीला एकांतात नेल्याचा आरोप. पाच ते सहा वेळा अयोग्य स्पर्श केल्याचा तक्रारीत उल्लेख. शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड; पोलिसांकडे तक्रार. न्यायालयाकडून आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी.

  • 07 Aug 2026 10:30 AM (IST)

    तीन वर्षीय चिमुकलीवरिल अत्याचाराच्या विरोधात आज भंडारा बंद

    भंडारा शहरात मानवाला कलंकित करणारी घटना घडली…. तीन वर्षीय बालिकेवर सार्वजनिक शौचालयात नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. घटनेच्या माहितीनंतर भंडारा शहरातील नागरिकांनी 30 वर्षीय नराधम रोहित वासनिक याला पोलिसांनी अटक केलं आहे…. प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशी देण्यात यावी….

  • 07 Aug 2026 10:25 AM (IST)

    निवडणुका देखील फ्राड पद्धतीने- राज ठाकरे

    राज ठाकरे यांच्या नाशिक दाैऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. यादरम्यान त्यांनी जोरदार टीका केली. निवडणुका देखील फ्राड पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.

  • 07 Aug 2026 10:21 AM (IST)

    समोरचे शत्रू संपवता, तेव्हा शत्रू तुमच्यामध्ये निर्माण होतात – राज ठाकरे

    समोरचे शत्रू संपवता, तेव्हा शत्रू तुमच्यामध्ये निर्माण होतात. ती प्रोसेस आता सुरु झालेली आहे. ती आता थांबू शकत नाही. धंदेवाईक जे क्लासेस निर्माण झालेत ते हटणार की नाही हटणार, सरकारचा पहिला कस इथे लागणार. वर्तमानपत्रांना जाहीराती द्यायच्या अशी टीका राज ठाकरेंनी केली.

  • 07 Aug 2026 10:20 AM (IST)

    कुंभमेळ्याचे ठेकेदार गुजरातचे- राज ठाकरे

    राज ठाकरे नाशिक दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान बोलताना त्यांनी म्हटले की, एक दुर्देव आहे की, कुंभमेळ्याचे ठेकेदार हे गुजरातचे असल्याचे कळाले.

  • 07 Aug 2026 10:16 AM (IST)

    नीट पेपरही कोंचिंग क्लासवाल्यांनीच फोडले – राज ठाकरे

    कोचिंग क्लास सर्वच वाईट आहे असं नाही. पण आता धंदा म्हणून जे आले, नीट पेपरही कोंचिंग क्लासवाल्यांनीच फोडले. आतापर्यंतचे पेपर कोचिंग क्लासवाल्यांनीच फोडले ना. नीलकनींनी पहिल्यांदा क्लासवर लक्ष दिलं पाहिजे असं राज ठाकरे बोलले.

  • 07 Aug 2026 10:13 AM (IST)

    कुंभमेळ्यातून पैसा काढणं, अर्थकारण हा उद्देश नव्हता – राज ठाकरे

    माझा अनुभव सांगतो, मी दोन कुंभमेळे असताना झाला. २००३ आणि २०१५चा. २००३चा कुणाला आठवत नसेल. २०१५बद्दल झाला. नाशिकमध्ये कामं झाले. कुंभमेळा झाला. नाशिक शहरालाही कळलं नाही. कसे काम चालू आहे. झाल्यावर लोकांना कळलं. कुंभमेळ्यातून पैसा काढणं, अर्थकारण हा उद्देश नव्हता म्हणून चांगला झाला असं राज ठाकरे म्हणाले.

  • 07 Aug 2026 10:08 AM (IST)

    जंतर-मंतरवर झालेलं आंदोलन ही सुरुवात – राज ठाकरे

    जंतर-मंतरवर झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे. हे आंदोलन घराघरात गेलं. सरकारने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. हे भाजपमधलचं अंतर्गत भांडणं आहे. त्याच गोष्टी आता चव्हाट्यावर येत आहेत असं राज ठाकरे म्हणाले.

  • 07 Aug 2026 10:06 AM (IST)

    माणसं मेल्याचं प्रशासनाला काही सोयरसुतक नाहीय – राज ठाकरे

    दिलीप गावित भेटायला आल्याचं माहित नव्हतं. दिलीप गावात दिल्लीहून आल्यावर त्यांची भेट घेईन असं राज ठाकरे म्हणाले. कुंभमेळ्याच अनेक कंत्राटदार गुजरातचे आहेत. स्मार्टसिटीचं काय झालं, माणसं मेल्याचं प्रशासनाला काही सोयरसुतक नाहीय अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

  • 07 Aug 2026 10:04 AM (IST)

    दिलीप गावित यांची भेट मीच घेणार आहे- राज ठाकरे

    दिलीप गावित यांच्या भेटीबद्दल राज ठाकरे यांनी म्हटले की, मला दिलीप गावित माझ्य भेटीला आले होते, याबाबत माहिती नव्हती. मीच दिलीप गावित यांची भेट घेणार आहे.

  • 07 Aug 2026 09:00 AM (IST)

    राज्यात ३० हजार जागांसाठी होणार शिक्षक भरती

    ११ ऑगस्ट पर्यंत अर्ज लॉक करता येणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , खाजगी आस्थापना या मध्ये पवित्र पोर्टल द्वारे भरती होत आहे. जिल्हा परिषद १३ हजार ३५१ , महापालिका १९५४ , नगरपालिका आणि नगरपरिषद २८० आदिवासींचे विकास विभाग २४२१ खाजगी शिक्षण संस्था १२ हजार शिक्षकांची भरती करणार आहेत.

  • 07 Aug 2026 08:50 AM (IST)

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट

    सूत्रांनुसार, मागील बैठकीत ठरल्यानुसार मोदींनी शिंदे यांना भेटीसाठी वेळ दिला होता. ‘Gen Z’ आंदोलनानंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात सुरू आहे सुनावणी, त्यामुळे मोदी- शिंदे भेटीला महत्त्व आले आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मोदी–शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.. बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

  • 07 Aug 2026 08:40 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

    नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा परिणाम केवळ पेरण्यांवरच नव्हे, तर पीक विमा नोंदणीवरही झाल्याचे दिसून येत आहे. पावसाअभावी लागवड क्षेत्र घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पीक विमा भरण्यासाठी १० ऑगस्ट ही अंतिम मुदत असून अवघे काही दिवस शिल्लक असतानाही अपेक्षित प्रमाणात नोंदणी झालेली नाही. दुसरीकडे, ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीएससी केंद्रांवर पोर्टल वारंवार बंद पडत असल्याने अनेक अर्ज अपूर्ण राहत असून, शेतीची कामे बाजूला ठेवून शेतकऱ्यांना केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत आहेत. अंतिम मुदतीपूर्वी पोर्टल सुरळीत करावे किंवा आवश्यक असल्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

  • 07 Aug 2026 08:30 AM (IST)

    पोळा सणानिमित्त मातीचे बैल बनवण्यात कुंभार व्यस्त. यंदा मातीच्या बैलांच्या किमतीत होणार वाढ

    पोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना माती आणि पी.ओ.पी.पासून तयार होणाऱ्या पारंपरिक बैलांच्या विक्रेत्यांवर यंदा महागाईचे सावट आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि मातीच्या टंचाईमुळे उत्पादन खर्च वाढल्याने कुंभार बांधवांनी बैलांना योग्य दर मिळण्याची मागणी केली आहे.धुळ्यातील पारंपरिक कुंभार कमला सीताराम मोरे यांनी सांगितले की, यंदा माती उपलब्ध न झाल्याने मातीच्या बैलांचे उत्पादन कमी झाले आहे. दुसरीकडे पी.ओ.पी., रंग, प्लास्टिकची शिंगे आणि इतर साहित्याच्या किमती वाढल्याने बैल तयार करण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे लहान पी.ओ.पी. बैलांच्या जोडीला किमान ५० ते १०० रुपये, तर मोठ्या बैलांच्या जोडीला १५० ते २०० रुपये अधिक दर मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. मातीच्या बैलांनाही योग्य भाव मिळाल्यास हा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवणे शक्य होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.महागाई आणि कच्च्या मालाच्या टंचाईमुळे कारागिरांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून, नागरिकांनी स्थानिक कुंभारांकडून बैल खरेदी करून त्यांच्या कलेला आणि उपजीविकेला पाठबळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • 07 Aug 2026 08:20 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत महायुतीतील फोडाफोडीचा मनसेला फायदा

    मनसे माजी आमदार राजू पाटील आणि शहर अध्यक्ष हर्षद पाटील यांच्या नेतृत्वात पलावा कार्यालयात शेकडो पदाधिकाऱ्यांचा भव्य पक्षप्रवेश झाला. पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीसह डॉक्टर आणि रुग्णांसाठी मनसेने नवीन ‘वैद्यकीय कक्ष’ ही सुरू केलेय भाजप खोटं हिंदुत्व गळ्यात मारून तरुणांचा वापर करते असा मनसे नेते राजू पाटलांचा भाजपवर घणाघाती प्रहार केला.

  • 07 Aug 2026 08:10 AM (IST)

    विदर्भातील काही जिल्ह्यात आज पावसाचा इशारा

    आठवडभराच्या विश्रांती नंतर नागपूर सह विदर्भातील काही जिल्ह्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाने इशारा दिला. काही जिल्ह्यांना साधारण पावसाचा इशारा तर अकोला , अमरावती , यवतमाळ जिल्ह्याला ऍलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपुरात सकाळ पासून पावसाचं आणि ढगाळ वातावरण , काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरात पावसाने विश्रांती घेतली होती काही प्रमाणात तापमानात सुद्धा वाढ झाली होतीय पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणात उकाळा वाढला होता मात्र सकाळ पासून वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकळ्या पासून दिलासा मिळताना दिसून येत आहेय हा पाऊस शेती साठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे

  • 07 Aug 2026 08:02 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कामानसंदर्भात बैठक होईल. बैठकीत नाशिकच्या खड्ड्यांबाबत देखील मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. शहरातील खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बैठकीत शहरातील कॉलनी रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर होण्याची शक्यता आहे.महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त तसेच कुंभमेळा आयुक्त बैठकीला उपस्थित असतील.

Published On - Aug 07,2026 8:01 AM

Follow Us
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?