AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घडामोड! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, PM मोदींची भेट घेणार; दोघांच्या बैठकीत…

eknath shinde delhi tour : एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्याला जाणार आहेत. या दौऱ्यात शिंदे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत.

मोठी घडामोड! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, PM मोदींची भेट घेणार; दोघांच्या बैठकीत...
| Updated on: Aug 07, 2026 | 8:30 AM
Share

देशाची राजधानी दिल्लीत शिवसेना पक्षफुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तवाद करण्यात येत आहे. सिब्बल हे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच असल्याचं न्यायालयाला पटवून देत आहेत. कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तिवादामुळे शिंदे गट अडचणीत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना पक्ष फुटीच्या खटल्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार असल्याचे समोर आलं आहे. या दिल्ली दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

दिल्लीत शिवसेना पक्ष फुटीसंदर्भात सुनावणी सुरू असताना एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावात पोहोचले होते. तब्बल दोन दिवस गावी मुक्कामी होते. त्यांच्या सातारा दौऱ्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. सातारा दौऱ्यानंतर आता एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. सूत्रांनुसार, मागील बैठकीत ठरल्यानुसार पंतप्रधान मोदींनी शिंदे यांना भेटीसाठी वेळ दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चावर होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत जेन-झी आंदोलन, मंत्रिमंडळ विस्तार आणि देशातील सध्याची परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जेन-झी आंदोलनाच्या मुद्द्यावर होणार चर्चा?

देशातील जेन-झी आंदोलनामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. जेन-झी आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना  मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. एक महिन्यानंतर दीपके दिल्लीहून छत्रपती संभाजनगरला पोहोचल्यानंतर शिंदे गटाचे नेतेही भेटीला पोहोचले होते. शिंदे गटातील बच्चू कडू आणि मंत्री संजय शिरसाट यांनी दीपकेंच्या घरी भेट दिली होती. यावरून शिंदेंनी नाराजी दर्शवली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. देशभर गाजलेल्या या जेन-झी आंदोलनावरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंत्रिमंडळाचा होणार विस्तार?

‘Gen Z’ आंदोलनानंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नरेंद्र मोदी एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मोदी- शिंदे भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही मोदी–शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांनी आणि इतर शिवसेना खासदारांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतली भेट घेतली होती. त्यानंतर आता शिंदे पंतप्रधान मोदींची भेट घेत असल्याने या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच