बारामतीत पवार कुटुंबाची धाकधूक वाढवण्यात भाजपला यश?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान पार पडलंय. चार टप्प्यांमध्ये हे मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी मतदान कमी झालंय, तर काही ठिकाणी मतदान कमी झालंय. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तिसऱ्या टप्प्यातही सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, रक्षा खडसे यांसारखे दिग्गज मैदानात आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यात तब्बल […]

बारामतीत पवार कुटुंबाची धाकधूक वाढवण्यात भाजपला यश?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान पार पडलंय. चार टप्प्यांमध्ये हे मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी मतदान कमी झालंय, तर काही ठिकाणी मतदान कमी झालंय. त्यामुळे सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तिसऱ्या टप्प्यातही सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, रक्षा खडसे यांसारखे दिग्गज मैदानात आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यात तब्बल 14 मतदारसंघात मतदान झालंय.

कोणत्या मतदारसंघात किती मतदान?

जळगावमध्ये यंदा 56.12 % मतदान झालं, 2014 मध्ये ही आकडेवारी 58 % इतकी होती.

रावेरमध्ये 61.40 % मतदान झालं, 2014 मध्ये 63.48 % मतदान झालं होतं.

जालन्यात 64.55 % मतदान झालं, 2014 मध्ये 66.15 % मतदानाची नोंद होती.

औरंगाबादमध्ये 63.41 % तर 2014 मध्ये 61.85 % मतदान झालं होतं.

रायगडमध्ये 61.81% तर 2014 मध्ये 64.47 % मतदान झालं होतं.

पुणे मतदारसंघात 49.84 % तर 2014 मध्ये ही आकडेवारी होती 54.14 % एवढी होती.

बारामतीत 61.54 % तर 2014 मध्ये 58.83 % मतदान झालं होतं.

अहमदनगरमध्ये 64.26 % तर 2014 मध्ये 62.33 % मतदान झालं होतं.

माढा मतदारसंघात 63.58 % तर 2014 मध्ये 62.53 % मतदान झालं होतं.

सांगलीत 65.44 % मतदान झालं, गेल्या निवडणुकीत हा आकडा 63.52 % इतका होता.

साताऱ्यात 60.37 % मतदान झालं, 2014 मध्ये 56.79 % मतदान झालं होतं.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये यंदा 61.69 % मतदान झालं, 2014 मध्ये ही आकडेवारी 65.56 % इतकी होती.

कोल्हापुरात 70.70 % मतदान झालं, तर 2014 मध्ये 71.72 % मतदान झालं होतं.

हातकणंगलेत 70.28 % मतदान झालं, 2014 मध्ये 73% मतदान झालं होतं.

युती आणि आघाडीकडून जोरदार प्रचार

सध्या 14 जागांवरांवरील खासदारांचा विचार केल्यास भाजपचे 6 आणि शिवसेनेचे 3 खासदार आणि राष्ट्रवादी 4 खासदार आहेत. तिसऱ्या टप्प्यात प्रचारात चिखलफेकही तितकीच झाली. बारामतीमध्ये भाजपकडून कांचन कुल यांना उमेदवारी देत पवार कुटुंबाची कोंडी करण्यात आली. पवारांनीही भाजपला त्यांच्याच शब्दात उत्तर दिलं.

सांगलीत पहिल्यांदाच काँग्रेसची माघार

काँग्रेसने सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडली होती. त्यामुळे गेल्या 70 वर्षात पहिल्यांदाच एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या सांगलीतच दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर उमेदवार द्यावा लागला. सांगलीत तिरंगी लढत होणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. कारण, वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर हे किती मतं घेतात यावर युती आणि आघाडीच्या उमेदवाराचा विजय अवलंबून असेल, असं विश्लेषक सांगतात.

बारामतीत पुन्हा एकदा पवारांची कोंडी

प्रत्येक उमेदवाराने आपापली ताकद लावली. पण मतदारांनी कोणाला पसंती दिलीय, हे तर ईव्हीएममध्ये बंद आहे. तिसऱ्या टप्प्यातील जवळपास प्रत्येक मतदारसंघात काँटे की टक्कर आहे. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत पुन्हा एकदा भाजपने जोरदार टक्कर दिली आहे. 2014 नंतर पुन्हा एकदा पवार कुटुंबाची धाकधूक वाढवण्यात भाजपने यश मिळवलंय, असं म्हणता येईल.

VIDEO : 48 मतदारसंघांचा लेखाजोखा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.