10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता : गिरीश महाजन

भाजपने आज (14 जुलै) नाशिकमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला.

10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता : गिरीश महाजन

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीनेही विधानसभेच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानुसार सर्वपक्षीयांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (14 जुलै) नाशिकमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला. “येत्या 10 किंवा 15 सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते. त्यानुसार यंदा 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल.” असा अंदाज गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये आयोजित केलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच गिरीश महाजन यांच्यासोबत खासदार हेमंत गोडसे, खासदार भारती पवार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखेचा हा अंदाज व्यक्त केला.

दरम्यान काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीच्या तारखेबाबत अंदाज व्यक्त केला होता. “येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे यंदा 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले होते.” त्यानंतर आता गिरीश महाजन यांनीही 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल, असे सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेतेही भाजपमध्ये येण्यास उत्सुक

काँग्रेस-राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक नेते भाजपमध्ये आले. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पुढच्या बाकावरचे नेते सोडले, तर त्यांच्यामागे उभं राहायला कोणी तयार नसल्याचाही आरोप महाजन यांनी केला. तसेच त्यांचे पहिल्या फळीतील नेतेही भाजपमध्ये येण्यास उत्सुक असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “आषाढा एकादशीला वारकऱ्यांचे डोळे जसे विठुरायाकडे लागतात, तसे आता अनेक नेते भाजपकडे डोळे लावून बसले आहेत. कारण त्यांना भाजपशिवाय पर्याय नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादीने 288 पैकी 50 चा आकडा पार करुन दाखवावा

गिरिश महाजन यांनी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना शुभेच्छा दिल्या. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने 288 विधानसभा जागांपैकी 50 चा आकडा पार करुन दाखवावा, असे आव्हान दिले. यावेळी त्यांनी आपण सांगत असलेले आकडे कधी खोटे निघत नसल्याचाही दावा केला.

संबंधित बातम्या :

15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता : चंद्रकांत पाटील

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *