AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weekend Lockdown : आमदारांचा निधी वाढवला, पण सर्वसामान्यांना एक रुपया नाही, भाजपचा सरकारवर हल्लाबोल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारनं लॉकडाऊन, कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला पण राज्य सरकारला एक रुपयाही दिला नाही, अशी टीका केलीय.

Maharashtra Weekend Lockdown : आमदारांचा निधी वाढवला, पण सर्वसामान्यांना एक रुपया नाही, भाजपचा सरकारवर हल्लाबोल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
sagar joshi
sagar joshi | Updated on: Apr 04, 2021 | 7:51 PM
Share

पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी विकेंड लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उपाययोजनांचा पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपसह मनसेनंही घेतलाय. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारनं लॉकडाऊन, कठोर निर्बंधांचा निर्णय घेतला पण राज्य सरकारला एक रुपयाही दिला नाही, अशी टीका केलीय. (Announce package for ordinary citizens, demand of Chandrakant Patil to Thackeray government)

‘सर्वसामान्यांसाठी पॅकेज जाहीर करा’

राज्यात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण आतापर्यंत सर्व सामान्य लोकांना एक रुपयाही दिला नाही. सर्वसामान्यांसाठी पॅकेज जाहीर करा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केलीय. राज्य सरकारला विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. त्यात सर्वसामान्य नागरिकांना पॅकेज देण्यासाठीही सांगण्यात आलं आहे. त्याबाबत सरकार काय करणार? असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पुण्यात पीएमपीएमलची बस सेवा बंद करण्यात आली आहे. मग कामगार वर्ग, सामान्य माणसाने प्रवास कसा करायचा? असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

राज्य सरकारने कोणत्याच घटकातील एकाही व्यक्तीला आर्थिक मदत केलेली नाही. आमदारांना न मागता निधी वाढवून दिला. आमदार पळून जाऊ नयेत म्हणून निधी वाढवला. हीच मदत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना करायला हवी होती, असं पाटील म्हणालेत.

हसन मुश्रीफांना आव्हान

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना चंद्रकांत पाटील यांनी एक आव्हान दिलंय. दुसऱ्या जागी जाऊन निवडून येण्यासाठी धमक लागते. मुश्रीफ यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडून यावं. कागल मतदारसंघात मतांचं विभाजन करुन ते निवडून येतात. त्यांनी दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफांना दिलं आहे.

राज्यात काय सुरु, काय बंद?

>> उद्यापासून रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार >> मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु राहणार >> राज्यात सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी असेल >> राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत. >> सर्व बांधकामे सुरु राहतील >> सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार >> भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील >> शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार. मात्र राज्यातील चित्रपटगृहे बंद राहणार >> सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक >> 50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

संबंधित बातम्या :

Maharashtra Weekend lockdown: राज्यात वीकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद

महाराष्ट्रात भयानक परिस्थिती, दिवसभरात 57 हजार रुग्ण, सरकारला सहकार्य करा, फडणवीसांचं कार्यकर्त्यांसह जनतेला आवाहन

Announce package for ordinary citizens, demand of Chandrakant Patil to Thackeray government

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...