महासेनाआघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द

महासेना आघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना भेटणार होते, मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे.

महासेनाआघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द
Follow us
| Updated on: Nov 16, 2019 | 4:29 PM

मुंबई : महासेना आघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना (meeting with governor postponed ) भेटणार होते, मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. महासेनाआघाडीचे नेते ओल्या दुष्काळासंदर्भात राज्यपालांना (meeting with governor postponed ) भेटणार होते. त्यासाठी तीनही पक्षांचे नेते एकत्र जमत होते, मात्र ऐनवेळी ही भेट रद्द झाली.

याबाबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भेट रद्द झाल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. शिंदेंनी जारी केलेल्या पत्रकानुसार, “शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि या तीनही पक्षांचे एक शिष्टमंडळ आज दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी ४.३० वाजता राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, उपरोक्त तीनही पक्षांचे  महत्वाचे नेते आणि आमदार  ओला दुष्काळ पाहणी दौरा, नुकसान पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी तसेच निवडणूक आयोगकडे निवडणुकीचा खर्चाचा तपशील आणि प्रतिज्ञापत्र जमा करणेसाठी आपापल्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे माननीय राज्यपाल महोदय यांची आजची नियोजित भेट तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.  मानानीय राज्यपाल महोदय यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटीची  पुढील वेळ लवकरच कळविण्यात येईल”, असं म्हटलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागितली होती. राजभवनावर तिन्ही पक्षांकडून नेमके कोणते नेते जाणार, हे स्पष्ट नव्हतं. मात्र तिन्ही पक्षाचे नेते पहिल्यांदाच उघडपणे एकत्र राज्यपालांची भेट घेणार होते, त्यामुळे या भेटीकडे राज्याचं विशेष लक्ष होतं.

राष्ट्रपती राजवट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापन करण्यात मोठे पक्ष असमर्थ ठरल्याने राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर 12 नोव्हेंबर संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.

संबंधित बातम्या  

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली   

देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला ‘पुन्हा आले’!  

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.