भाजप नेते कल्याणरावांच्या घरी जाऊन बसले, अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना : अजित पवार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची (Pandharpur Mangalvedha bypoll) प्रचारसभा झाली.

भाजप नेते कल्याणरावांच्या घरी जाऊन बसले, अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना : अजित पवार
Ajit Pawar
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 2:37 PM

पंढरपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची (Pandharpur Mangalvedha bypoll) प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषण केलं. अजित पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रचारसभेत भाजप नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. (Mahrashtra DCM Ajit Pawars comment on Kalyanrao Kale and BJP at Pandharpur Mangalwedha bypolls rally)

त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “कल्याणराव काळे राष्ट्रवादीत जाणार म्हटल्यावर अनेकांच्या पोटात दुखलं. दोन तीन दिवस भाजपचे नेते कल्याणराव काळेंच्या घरी जाऊन बसले. अरे तुम्हाला कुठे घालायची घाला ना”

कल्याण काळे राष्ट्रवादीत

अवघ्या दोन वर्षांतच कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावरुन “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता” अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार आहे.

VIDEO: अजित पवार नेमकं काय म्हणाले?

विधानसभेच्या तोंडावर भाजपात प्रवेश

कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. मात्र 2019 मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

कोण आहेत कल्याण काळे?

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले

माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार

राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम

भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष

सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक

श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवले होते

राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष

संबंधित बातम्या  

VIDEO | “दादा मास्क काढा” भाषणादरम्यान चिठ्ठी, अजित पवार म्हणतात, “हा शहाणा मला सांगतोय”

मधल्या काळात ट्रॅक चुकला, भाजपला टोले, कल्याणराव काळे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत

(Mahrashtra DCM Ajit Pawars comment on Kalyanrao Kale and BJP at Pandharpur Mangalwedha bypolls rally)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.