एकीकडे खोतकर-सत्तार गुफ्तगू, दुसरीकडे दानवे-टोपे गळाभेट

जालना : जालन्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अर्जुन खोतकर नाराज झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध निवडणूक लढण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी शड्डू ठोकला आहे. त्यातच, जालन्याच्या राजकीय वर्तुळात काहीसे धक्के देणारे प्रसंग घडू लागले आहेत. खोतकर-सत्तार गुफ्तगू शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर …

एकीकडे खोतकर-सत्तार गुफ्तगू, दुसरीकडे दानवे-टोपे गळाभेट

जालना : जालन्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतर, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अर्जुन खोतकर नाराज झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध निवडणूक लढण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी शड्डू ठोकला आहे. त्यातच, जालन्याच्या राजकीय वर्तुळात काहीसे धक्के देणारे प्रसंग घडू लागले आहेत.

खोतकर-सत्तार गुफ्तगू

शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर हे नाराज असल्याची चर्चा आहे. दानवेंविरोधात लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या खोतकरांना सेना-भाजप युतीमुळे लढता येत नाहीय. त्यामुळे खोतकर काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत असतानाच, अर्जुन खोतकर हे काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना भेटले. जवळपास एक तासभर खोतकरांनी अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा केली. खोतकर-सत्तार यांच्यात बंददाराआड झालेल्या चर्चेचा तपशील कळू शकला नाही.

राज्यमंत्री खोतकर भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यासोबतच्या गुफ्तगूला महत्त्व आलं आहे. आपण ठाकरे कुटुंबाशी गद्दारी करणार नाही, असे खोतकरांनी आधीच स्पष्ट केले असले, तरी सत्तार यांच्याशी झालेली भेट पेचात टाकणारी आहे. जालना लोकसभा मतदार संघातील वातावरण  या भेटीमुळे ढवळून निघालं आहे.

दानवे-टोपे गळाभेट

दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री राजेश टोपे यांची गळाभेटही जालन्यात काल गाजली. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे एका लग्न समारंभाच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. ही गळाभेट उपस्थितांना धक्का देणारी होती.

एकीकडे दानवेंना भाजपचा मित्रपक्ष असलेल्या सेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचा सातत्याने होणारा विरोध आणि दुसरीकडे खोतकरांच्या काँग्रेसप्रवेशाच्या चर्चेवेळी राष्ट्रवादीच्या नेत्यासोबत गळाभेट  यामुळे दानवे-टोपे गळाभेट जालन्यात चर्चेचा विषय ठरली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *