AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ दोषमुक्त! त्या महत्त्वाच्या खटल्यात विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालय कंत्राट लाच प्रकरणात भुजबळ दोषमुक्त करण्यात आलं आहे.

छगन भुजबळ दोषमुक्त! त्या महत्त्वाच्या खटल्यात विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय
Chhagan Bhujbal Mumbai University Library Contract CaseImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 3:29 PM
Share

मुंबई विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या कंत्राट वाटपाशी संबंधित 2016च्या कथित लाच प्रकरणात मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. 24 सप्टेंबर 2026 रोजी न्यायालयाने हा निर्णय दिला. भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना एका खासगी विकासकाला भूखंड अत्यंत कमी दराने भाडेपट्ट्यावर देण्यात आल्याचा आणि त्यातून कथित लाचखोरी झाल्याचा आरोप होता. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोप केले होते. या कथित व्यवहारामुळे राज्य सरकारचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा सरकारी पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र, सुनावणीनंतर विशेष एसीबी न्यायालयाने भुजबळांना या प्रकरणातून दोषमुक्त केले आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते सध्या राज्य सरकारमध्ये छगन भुजबळ हे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री आहेत. भुजबळांचे नाव कलिना येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारत बांधकाम कंत्राटामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणामध्ये नाव आले होते. या प्रकरणामध्ये आता छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमकं काय होतं हे प्रकरण?

विद्यापीठाच्या संकुलात सुमारे 23 हजार 438 चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये प्रस्तावित ग्रंथालयाचे बांधकाम करण्याचे कंत्राट इंडिया बूल्स रिअल इस्टेट कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने छगन भुजबळ पब्लीक वेल्फेअर फाऊंडेशनच्या खात्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये अडीच अडीच कोटी रुपये जमा केले होते. त्यानंतर कंपनीने भुजबळांना लाच दिली आणि भुजबळांचे सगळे कुटुंब या फाऊंडेशनचे लाभार्थी आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे केला होता. त्यानंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश इडी आणि एसीबीला देण्यात आले होते.

त्यानंतर भुजबळांसोबत तत्कालिन उपविभागीय अभियंता गजानन सावंत, कार्यकारी अभियंता हरिश पाटील, अधिक्षक अनिलकुमार गायकवाज अपर सचिव संजय सोळंकी आणि बांधकाम सचिव एम. एच शाहा यांना याप्रकरणी आरोपी करण्यात आले होते.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा