दोन हजारच्या परत करण्याच्या निर्णयावरून ममता बॅनर्जी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या…

Reserve Bank decision about 2000 Rupee Note : दोन हजारच्या परत करण्याच्या रिजर्व्ह बँकेच्या सूचना; ममता बॅनर्जी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; पाहा नेमकं काय म्हणाल्या...

दोन हजारच्या परत करण्याच्या निर्णयावरून ममता बॅनर्जी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाल्या...
ममता बॅनर्जी
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 6:50 PM

नवी दिल्ली : 2000 च्या नोटे संदर्भात रिजर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतलाय. 2000 च्या नोचा बॅंकेत जमा करण्याच्या सुचना रिजर्व्ह बँकेने दिल्या आहेत. 30 सप्टेंबपर्यंत दोन हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा जमा करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर अशी मुदत दिली आहे. त्यावर तृणमूलच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ममता बॅनर्जी यांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जी यांचं ट्विट

2000 रुपयांच्या नोटांचं आणखी एक लहरी आणि तुघलकी नोटाबंदीचं नाटक. रिजर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे सामान्य लोकांना पुन्हा एकदा प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. असे मोदी सरकारचे निर्णय हे जनतेच्या विरोधातील आहेत. जनता हे सगळं अशी हुकूमशाही लोक विसरणार नाहीत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

राज्यसभेचे खासदार आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनीही रिजर्व्ह बँकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी निर्य घेतल्याचं तेव्हा सरकारकडून सांगण्यात आलं. त्याचा काही फायदा झाला का? उलट भ्रष्टाचार वाढतच गेला आहे. तुमचं काय मत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी?, असं ट्विट कपिल सिब्बल यांनी केला आहे.

केजरीवाल यांचा सरकारवर हल्लाबोल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरबीआयच्या निर्णयावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. आधी म्हणाले, दोन हजाराची नोट चलनात आणल्याने भ्रष्टाचार संपेल. आता म्हणतायेत दोन हजाराची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल. याच साठी मी म्हणतो पंतप्रधान शिकलेला असावा. अशिक्षित पंतप्रधानाला कुणी काहीही बोलून जातं. त्याला काही कळत नाही. भोगावं मात्र जनतेला लागतं, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.