मणिपूर अस्थिर; अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अजित पवार यांचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र

Manipur Violence News : अजित पवार यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; वाचा सविस्तर...

मणिपूर अस्थिर; अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अजित पवार यांचं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 5:05 PM

पुणे : मणिपूर राज्यात सध्या हिंसाचार उसळला आहे. यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झालाय. अशात महाराष्ट्रातून मणिपूरला शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विधनसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. “आपले विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकले आहेत. त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्या विद्यार्थ्यांना कसं आणायचं? यासाठी मी पत्र लिहिलंय. त्याबद्दल त्यांनी केंद्राही बोलून सुरक्षितपणे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणावं. अशी विनंती केली आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

मणिपूरमधील परिस्थितीबद्दल मेरी कोमनंही विधान केलंय. तिथली परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणावी.दिसताच क्षणी गोळ्या घाला असे आदेश आले होते, असं कानावर आलं होतं. पण तिथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणणं गरजेचं आहे.

मणिपूर धगधगतंय

मणिपूर मागच्या काही दिवसांपासून धगधगतं आहे. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी हा हिंसाचार थांबवण्याचं आवाहन केलं आहे. तसंच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलंय. अजित पवार भाजपसोबत जाणार का हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. त्यावरही अजित पवार बोललेत. तुम्ही प्रश्न विचारता म्हणून संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं जातं. ज्यांना माझं काम बघवत नाही. ज्यांना मी जे करतो त्याबद्दल काहीतरी मनात असतं. आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते माझ्याबद्दल संभ्रमाचं वातावरण तयार करतात, असं अजित पवार म्हणालेत.

राज ठाकरे यांची काल रत्नागिरीत सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली. त्याला अजित पवार यांनी खोचक उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय काय जमतं? मिमिक्री करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.