AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेचे पैसे काय घर विकून दिले काय?; मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

29 ऑगस्टला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मराठा समाज आरक्षणासाठी एकवटला होता. अंतरवालीमध्ये मराठा समाजाचे आंदोलन हे देशातील सर्वात मोठे आंदोलन ठरले होते. या आंदोलनामुळे सरकारचा मराठा समाज आणि गोरगरिबांविषयी असणारा द्वेष उघडा पडला, असं मनोज जरांगे म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचे पैसे काय घर विकून दिले काय?; मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 22, 2024 | 8:06 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवर जोरदार टीका केली आहे. लाडकी बहीण योजना चांगली असेल तर मला माहीत नाही. पण या योजनेसाठी दिलेले पैसे हे जनतेचे आहेत. त्यांनी थोडीच घर विकून पैसे दिलेत? हे पैसे राज्यातील जनतेचे आहेत, अशी जोरदार टीका मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. निवडणूक जवळ आल्यावर हे लोकांना नादी लावतात. हे देतो, ते देतो म्हणून घोषणा करतात आणि गरीबांचे रक्त पितात, असा हल्लाच मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी हा हल्ला चढवला आहे.

तुम्ही जर प्रत्येकवेळी श्रीमंतांनाच निवडून आणलं तर ते मोठे होतील. तुमची लेकरं मोठी होणार नाहीत. गरीबांना खोटी आश्वासनं दिली जात आहेत. धनगर, मुसलमान आणि मराठ्यांना फसवलं आहे. आता हे लोकांच्या लक्षात आलं आहे. हे तात्पुरते नादी लावतात. पैसे देतात. पण हे पैसे काही आयुष्याला पुरत नाहीत. आपल्याला आयुष्यासाठी कायमच्या सुविधा हव्या आहेत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीसांचं षडयंत्र मोडीत काढणार

आम्ही महाराष्ट्रातील सर्व विधानसभा जागा लढवणार आहोत. राखीव जागा आम्ही तर पूर्ण काढणार आहोत, त्याबाबत दुमतच नाही. ज्या जागा आमच्या विचाराच्या आहेत. त्या फिक्स आहेत. आमच्या एससी एसटीच्या जागाही फिक्स आहेत. राज्यातील सर्वा जागा लढवायच्या की पाडायच्या हे अजून ठरायचे आहे. पण आमची राखीव जागांबाबतची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही छत्रपतींचे गनिमी कावे वापरू. त्यांच्या लक्षात येऊ देणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र आम्ही मोडून काढणार आहोत, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.

दिशाच बदलून टाकायची आहे

गोरगरिबांच्या मानगुटीवर बसणारे हे लोक आता उघडे पडायला लागले आहेत. काहीही झाले तरी मराठा मात्र मागे हटणार नाही आणि मीही मागे हटणार नाही. मागे जे व्हायचे ते होऊद्या. मी काही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटत नाही. श्रीमंत हा श्रीमंत होत चालला आहे आणि गरीब हा गरीब होत चालला आहे. मला तेच नेमके उलटे करायचे आहे. गरीब मोठा कसा होईल आता हेच बघायचे आहे. श्रीमंत का मोठा होऊ द्यायचा? आता ही दिशा बदलून टाकायची आहे, असंही त्यांनी सांगितलं.

म्हणून निवडणूक पुढे ढकलत आहेत

त्यांना आमची रणनीती बघायची आहे. आमच्या भूमिकेकडे त्यांचं लक्ष लागलं आहे. आम्ही कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार देतो याचं नियोजन बघायचं आहे. आता मराठे रेटत नाहीत. धनगर ऐकत नाहीत. आणि सामान्य ओबीसींना अनेक प्रश्न आहेत. यांचा नेरेटिव्ही भरून निघत नाही. कारण जनतेत आक्रोश आहे. म्हणून ते निवडणूक पुढे ढकलत आहेत. राष्ट्रपती त्यांचे आणि राज्यपालही त्यांचे आणि प्रशासक ही त्यांचा आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.