AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनात आजी-माजी आमदार भिडले! सुनील शेळके आणि बाळा भेगडेंमध्ये शाब्दिक चकमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीमधील चौथ्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानी विविध मागण्यांबाबत रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडेही सहभागी झाले होते.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनात आजी-माजी आमदार भिडले! सुनील शेळके आणि बाळा भेगडेंमध्ये शाब्दिक चकमक
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 4:02 PM

पुणे : मावळ तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनात आजी-माजी आमदार भिडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीमधील चौथ्या टप्प्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानी विविध मागण्यांबाबत रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडेही सहभागी झाले होते. (Agitation Allegations between NCP MLA Sunil Shelke and former BJP MLA Bala Bhegade)

तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक 4 कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या सातबारावर टाकलेले 32 (2) चे शिक्के काढण्यासाठी तळेगाव एमआयडीसीमधील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सुनील शेळके यांनी बाळा भेगडे सहभागी झाले होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टिप्पणी केल्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी काही काळ वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनानं आजी-माजी आमदारांमध्येच जुंपल्यामुळे त्याच विषयाची चर्चा अधिक होत आहे.

सुनील शेळके, बाळा भेगडे आपसांत भिडले

आंदोलनात सहभागी झाल्यानंतर विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी आपल्या भाषणात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असा गंभीर आरोप केला. त्यानंतर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन त्यांना पैसे द्यावे, असं वक्तव्य केलं. त्यानंतर सुनील शेळके यांनी वैयक्तिक बोलू नका असं सांगितल्यानंतर भेगडे आणि शेळके यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांची उणीदुणी काढल्याचं पाहून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मावळमधील इंद्रायणी भाताची हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त

मावळ तालुक्याला भात पिकाचे आगार म्हटले जाते. तालुक्यात 12 हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर भात पिकाची शेती केली जाते. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मावळातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अंदर मावळ तसेच पवन मावळ या दोन्ही पट्ट्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते.

या भागात पावसाचे प्रमान जास्त असल्याने प्रामुख्याने मावळ भागातील शेतकरी हा भात पीक घेत असतो. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने शेतकरी हतबल झालाय. मावळ भागात मुसळधार पावसामुळे धबधब्यांना यंदा पाचपट जास्त पाणी आल्याने डोंगर दऱ्याखोऱ्यातील माती दगड मोठ्या प्रमाणात वाहून आली. त्यामुळे भात खाचरांवर पूर्णपणे गाळ साचला आहे. परिणामी भात पीक पूर्णपणे नष्ट झाले आहेत यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा भात पिकाचे उत्पन्न देखील घटणार आहे.

इतर बातम्या :

VIDEO: चंदनाचा पाट, सोन्याचं ताट दिलं, पण ताटात काहीच नाही, खायचं काय?; विनायक राऊतांचा केंद्रावर हल्ला

FYJC CET Exam Cancelled : मुंबई हायकोर्टाकडून अकरावीची सीईटी परीक्षा रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया…

Allegations between NCP MLA Sunil Shelke and former BJP MLA Bala Bhegade

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.