VIDEO : रिक्षा, रेल्वे, बैलगाडीनंतर पार्थ पवार आता घोड्यावर

पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकीचं वारं देशभर वाहू लागलं आहे. प्रचाराचा धुरळाही उडू लागला आहे. उमेदवार नवनव्या क्लृप्त्या शोधून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी चक्क घोड्यावर रपेट मारली आहे. याआधी पार्थ पवार यांनी रिक्षा, रेल्वे, बैलगाडी यामधूनही प्रवास केला होता. त्यावेळी सर्वसामान्य लोकांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या …

parth pawar, VIDEO : रिक्षा, रेल्वे, बैलगाडीनंतर पार्थ पवार आता घोड्यावर

पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकीचं वारं देशभर वाहू लागलं आहे. प्रचाराचा धुरळाही उडू लागला आहे. उमेदवार नवनव्या क्लृप्त्या शोधून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी चक्क घोड्यावर रपेट मारली आहे. याआधी पार्थ पवार यांनी रिक्षा, रेल्वे, बैलगाडी यामधूनही प्रवास केला होता. त्यावेळी सर्वसामान्य लोकांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या होत्या.

parth pawar, VIDEO : रिक्षा, रेल्वे, बैलगाडीनंतर पार्थ पवार आता घोड्यावर

निवडणुकीचा प्रचार म्हटल्यावर लोकांमध्ये मिसळणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार अनोख्या शक्कल लढवत असतात. मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी तर थेट घोड्यावरुन रपेट मारत, मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी पार्थ पवार यांनी माध्यमांशीही संवाद साधला. ते म्हणाले, “प्रत्येक भाषण ट्रोल होत असेल, तर ज्यावेळी माणूस प्रगती करत असतो, त्यावेळीच तो ट्रोल होत असतो. या ज्या ट्रोलच्या गोष्टी आहेत, त्या खूप छोट्या गोष्टी आहेत. मीडियाला सुद्धा तेच लावून धरायचं आहे का, मला माहित नाही.”

दोनच दिवसांपूर्वी पार्थ पवार यांचा धावतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ट्राफिकमध्ये अडकल्याने सभेला उशीर होत असल्याने, पार्थ पवार गाडीतून उतरून धावत गेले होते. या प्रसंगाचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

कोण आहेत पार्थ पवार?

पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पार्थ हे नातू आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *