पंतप्रधान मोदींचे मानसिक संतुलन बिघडले, उपचाराची गरज : भुपेश बघेल

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेनंतर विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवत मोदींचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली. तसेच त्यांच्यावर उपचाराची गरज असल्याचे म्हटले. भुपेश बघेल म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या मनात देशप्रेम, राष्ट्रप्रेम, बलिदानाप्रति अजिबाद सन्मान नाही. त्यांचे फक्त सत्तेच्या खुर्चीवर …

पंतप्रधान मोदींचे मानसिक संतुलन बिघडले, उपचाराची गरज : भुपेश बघेल

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेनंतर विरोधकही आक्रमक होताना दिसत आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवत मोदींचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली. तसेच त्यांच्यावर उपचाराची गरज असल्याचे म्हटले.

भुपेश बघेल म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या मनात देशप्रेम, राष्ट्रप्रेम, बलिदानाप्रति अजिबाद सन्मान नाही. त्यांचे फक्त सत्तेच्या खुर्चीवर प्रेम आहे. ते सत्ता मिळवण्यासाठी किती खालचा स्तर गाठतील याची कल्पनाही करता येणार नाही. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना उपचाराची गरज आहे.

पंतप्रधान मोदींनी माफी मागावी

भुपेश बघेल यांनी काँग्रेसच्या राज्य मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदींच्या माफीची मागणी केली. ते म्हणाले, “माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे योगदान देशाच्या विकासात मैलाचा दगड ठरले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि स्थानिक स्वराज्य संस्था या क्षेत्रातील काम त्यापैकीच एक आहे. त्यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी बलिदान दिले आहे. त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींविरोधात जी निषेधार्ह टीका केली त्याबद्दल देशाची माफी मागावी.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *