AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेची दुर्दैवी अवस्था, मलाही सहानुभूती, MIM शी युती होणार का? वाचा थेट स्पष्ट

शिवसेनेत आता खूप बदल झालाय. सत्ता मिळवण्यासाठी ते कुणालाही सोबत घेतायत. पण एमआयएम शिवसेनेसोबत जाणार नाही, असं वक्तव्य खा. जलील यांनी केलंय.

शिवसेनेची दुर्दैवी अवस्था, मलाही सहानुभूती, MIM शी युती होणार का? वाचा थेट स्पष्ट
खा. इम्तियाज जलीलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2022 | 3:31 PM
Share

दत्ता कनवटे, औरंगाबादः मुस्लिम समाज ज्यांची पंचिंग बॅग होता. स्टेजवर उभे राहून जे मुस्लिमांना टार्गेट करायचे, आता ते तसं करू शकणार नाहीत. शिवसेनेची (Shivsena) सध्याची अवस्था अत्यंत दुर्दैवी आहे. मलाही त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असं वक्तव्य एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केलंय. महाराष्ट्राने आजपर्यंत एवढं घाणेरडं राजकारण पाहिलेलं नाही. आता सत्ता मिळवण्यासाठी कुणीही सोबत घेण्याची शिवसेनेची तयारी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत ते आहेतच, आता एमआयएमलाही सोबत घेणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय. यावर खा. जलील यांनी स्पष्टपणे नकार दिला. औरंगाबादमध्ये त्यांनी tv9 च्या प्रतिनिधींशी मोकळा संवाद साधला.

शिवसेना एमआयएमला असा प्रस्ताव देणार नाही आणि दिला तरी आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाहीत, असं स्पष्ट शब्दात खा. जलील यांनी उत्तर दिलंय. भाजपने शिवसेना फोडून मराठी मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन केल्याचं पाप केलंय, असा आरोप खा. जलील यांनी केलाय. ते म्हणाले, ‘ महाराष्ट्राने कधीही एवढं घाणेरडं राजकारण पाहिलेलं नाही. शिवसेनेसोबत आमचे मतभेद आहेत.. पण मराठी अस्मिता शिवसेनेशी जोडलेली होती. मराठी लोकांसाठी ते एक ढाल म्हणून उभे होते. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती अमित शहा आणि भाजपमुळे झाली आहे. मराठी लोकांना त्यांनी फोडलंय, ते दुर्दैवी आहे. आतापर्यंत जे कुणी करू शकलं नाही, ते भाजपने केलंय. मराठी लोकांना फोडण्याचं पाप भाजपने केलंय, असा आरोप खा. जलील यांनी केला.

शिवसेनेबाबत मला सहानुभूती आहे. मीसुद्धा मराठी आहे. तुम्ही मला वेगळं समजू नका. महाराष्ट्रीयन आहे. शिवसेनेच्या राजकारणाला आजपर्यंत धार्मिक रंग होता, ती वेगळी गोष्ट आहे. त्यांची सॉफ्ट पंचिंग बॅग मुस्लिम समाज होता. पण आता शिवसेना फुटली. मुस्लिमांवर टार्गेट करायचे.. मंदिर, मस्जिद, खान, बाण असायचं. आता ते तसं करू शकणार नाहीत…असं वक्तव्य खा. जलील यांनी केलंय.

शिवसेनेत आता खूप बदल झालाय. सत्ता मिळवण्यासाठी ते कुणालाही सोबत घेतायत. पण एमआयएम शिवसेनेसोबत जाणार नाही, असं वक्तव्य खा. जलील यांनी केलंय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.