AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालिका निवडणुकीबाबत MIM चं मोठं पाऊल, एका निर्णयामुळे मविआचं टेन्शन वाढलं; काय घडतंय?

एमआयएमने घेतलेल्या या निर्णयाबाबत पक्षाचे नेत इम्तियाज जलील यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.

पालिका निवडणुकीबाबत MIM चं मोठं पाऊल, एका निर्णयामुळे मविआचं टेन्शन वाढलं; काय घडतंय?
aimim and asaduddin owaisi
| Updated on: May 15, 2025 | 6:07 PM
Share

MIM : येत्या चार महिन्यांत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. या आदेशानंतर आता निवडणूक आयोगासह राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत आपलाच झेंडा फडकावा, यासाठी राजकीय पक्षांकडून विशेष रणनीती आखली जात आहे. असे असतानाच राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या एमआयएम या पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. या पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा फटका आता महाविकास आघाडीला बसतो की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एमआयएमने नेमका काय निर्णय घेतला आहे?

एमआयएमने घेतलेल्या या निर्णयाबाबत पक्षाचे नेत इम्तियाज जलील यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. यावेळी आमचा पक्ष महापालिकेच्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका लढवणार आहे, असं सांगितलंय. एमआयएमच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इम्तियाज जलील यांनी नेमकं काय सांगितलं?

एमआयएमची बैठक झाली. आमचा पक्ष येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार आहे. आम्ही लवकरच सदस्यता मोहीम राबवणार आहोत. फक्त महानगर पालिकाच नाही, तर सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जाणार आहेत, असं जलील यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच भाजपाची सोशल मीडिया टीम पैशाने कोणतीही बातमी पसरवते. एमआयएमची मजबूत सोशल मीडिया टीम तयार केली जाईल. राष्ट्रीय प्रवक्त्याचीही नियुक्ती केली जाईल, अशी माहिती जलील यांनी दिली.

पक्षातर्फे अनेक बैठका आयोजित केल्या जाणार

तसेच युतीच्या बाबतीत जिल्हास्तरीय नेत्यांना जबाबदारी दिली जाईल. एमआयएमकडून अनेक मोठ्या बैठका आयोजित केल्या जातील. ज्यात खासदार असदुद्दीन ओवैसी देखील उपस्थित राहतील. आम्ही भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी किंवा एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष यांच्याशी युती करणार नाही, असं जलील यांनी जाहीरपणे सांगितलं.

महाविकास आघाडीला फटका बसणार का?

महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राज्यातील काही मुस्लीम मतदार या तिन्ही पक्षांना मतदान करतात. पण एमआयएमने महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे एमआयएम हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलाच तर मुस्लीम मतदार या पक्षाकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही शक्यता खरी ठरली तर महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसू शकतो. असे होऊ नये म्हणून महाविकास आघाडीला स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीचं राजकारण करावं लागेल.

दरम्यान, अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...