AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाने उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली त्या घरात गद्दारी करणं चुकीचं आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी पलटवार केला आहे.

सर्वात मोठी बातमी! शिंदे गटाने उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट
शिंदे गटाने उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोटImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 05, 2022 | 11:17 AM
Share

जळगाव: शिंदे गटाने उठाव का केला? याचं उत्तर शिंदे गटाने अनेकदा दिलं आहे. आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने (ncp) शिवसेना (shivsena) संपवली असती असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र, आता शिंदे गटाने या प्रश्नाचं पहिल्यांदाच वेगळं उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत (bjp) हातमिळवणी केली असती, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आक्रमक नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

शहाजी बापू पाटील यांनी दावा केला आहे की राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती, असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी काढलाय.

आताही शिंदे गटाने हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती, असा गौप्यस्फोट गुलाबराव यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. यावरही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अधिवेशन संपलंय. पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह कायम राहावा आमदारांमध्ये फूट पडू नये म्हणून राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची विधाने केली जात आहेत, असं सांगतानाच आमचं सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

ज्या घरात वाढले, ज्या घराने ओळख दिली त्या घरात गद्दारी करणं चुकीचं आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी पलटवार केला आहे. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे? आम्ही मूळ शिवसेना आहोत. बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे. आम्ही भाजपमध्ये गेलो का?bआम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहोत, असा दावा त्यांनी केला.

ज्या पद्धतीनं आम्हाला ढाल तलवार चिन्हही मिळालं आहे. आम्ही पक्षांतर केलेलं नाही. जे पक्षांतर करतात त्यांच्यासाठी अजित पवारांचं वक्तव्य असेल असा चिमटाही त्यांनी काढला.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.