ही तर सुरुवात, येत्या काळात नगरमधील अनेकजण राष्ट्रवादीत प्रवेश करतील, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

ही तर सुरुवात, येत्या काळात नगरमधील अनेकजण राष्ट्रवादीत प्रवेश करतील, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

भाजपातील अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावाही प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. (Prajakt Tanpure On BJP Leader May Join NCP)

Namrata Patil

|

Nov 03, 2020 | 2:36 PM

अहमदनगर : राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल याबाबत मला कोणतीही शंका नाही, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. तसेच येत्या काळात नगर जिल्ह्यातील भाजपातील अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा दावाही प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. (Prajakt Tanpure On BJP Leader May Join NCP)

“राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्ष नक्की पूर्ण करेल याबाबत मला कोणतीही शंका नाही. आमच्या सरकारची पाच वर्ष नक्की पूर्ण होतील आणि हे पाच वर्ष अशा पद्धतीने पूर्ण होतील की पुढची पाच वर्षही आमचं सरकार तिथे असेल,” असे प्राजक्त तनपुरे म्हणाले.

“ही तर अजून सुरुवात आहे. येत्या काळात नगर जिल्ह्यातील भाजपची आणखी काही मंडळी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, ही तर आता सुरुवात आहे,” असेही प्राजक्त तनपुरे म्हणाले.

दरम्यान गेली 40 वर्षे भाजपला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन भाजपचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाचं योगदान देणारे भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी पत्नी मंदाकिनी, कन्या रोहिणी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर कोणीही भाजप सोडून जाणार नाही. जे हौशे-गवशे असतील तर तेच जातील. कोणत्याही नगरसेवकाने, जिल्हा परिषद सदस्याने राजीनामा दिलेला नाही, अशी टीका भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केली होती.(Prajakt Tanpure On BJP Leader May Join NCP)

संबंधित बातम्या : 

एकनाथ खडसे यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश, नव्या राजकीय इनिंगला सुरुवात!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें